विद्याभाऊ सदावर्ते

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.

विद्याभाऊ सदावर्ते (१९३८ - २५ मार्च, २०१८) हे मराठवाड्यातील पत्रकार होते.

त्यांनी अजिंठा, लोकमत, देवगिरी, तरुण भारत, गावकरीसांजवार्ता, एकमत या वर्तमानपत्रांमध्ये विविध पदांवर काम केले. मराठवाड्याचे पहिले दैनिक अजिंठा या नांदेडहून प्रकाशित होणाऱ्या वर्तमानपत्राचे ते संपादक होते. सदावर्ते यांचे इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भाषेवर प्रभुत्व होेते. जागतिक राजकारणाचा त्यांचा सखोल अभ्यासही होता. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा दुधगावकर पुरस्कार, दर्पण पत्रकारिता, विश्वसंवाद संस्थेचा नारद पुरस्कार, तसेच अरविंद आ. वैद्य पुरस्कार आदी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कारसुद्धा त्यांना मिळाला होता. अनेक इंग्रजी पुस्तकांचा त्यांनी अनुवाद केलेला आहे.