विद्याचरण शुक्ला
Appearance
विद्याचरण शुक्ला (ऑगस्ट २, इ.स. १९२९ - जून ११, इ.स. २०१३) हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते छत्तीसगढ राज्यातील महासमुंद लोकसभा मतदारसंघातून इ.स. १९५७, इ.स. १९६२, इ.स. १९६७, इ.स. १९७१, इ.स. १९८०, इ.स. १९८४, इ.स. १९८९ आणि इ.स. १९९१च्या लोकसभा निवडणुकांमध्ये लोकसभेवर निवडून गेले. त्यांनी इंदिरा गांधी सरकारमध्ये माहिती आणि प्रसारणमंत्री म्हणून काम बघितले. इ.स. १९८९ ते इ.स. १९९१ दरम्यान ते काँग्रेस पक्षाबाहेर होते. इ.स. १९९० ते इ.स. १९९१ या काळात ते चंद्रशेखर सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री होते. इ.स. २००४ मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि काँग्रेस नेते अजित जोगी यांच्याविरूद्ध त्यांनी महासमंद लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढवली. पण त्यात त्यांचा पराभव झाला. नंतरच्या काळात त्यांनी काँग्रेस पक्षात पुनर्प्रवेश केला.
वर्ग:
- भारतीय राजकारणी
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी
- भारतीय परराष्ट्रमंत्री
- भारतीय माहिती आणि प्रसारणमंत्री
- २ री लोकसभा सदस्य
- ३ री लोकसभा सदस्य
- ४ थी लोकसभा सदस्य
- ५ वी लोकसभा सदस्य
- ७ वी लोकसभा सदस्य
- ८ वी लोकसभा सदस्य
- ९ वी लोकसभा सदस्य
- १० वी लोकसभा सदस्य
- महासमुंदचे खासदार
- इ.स. १९२९ मधील जन्म
- इ.स. २०१३ मधील मृत्यू