विजयसिंह शेखावत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

विजयसिंह शेखावत (१ ऑक्टोबर, १९३६:भिवनी, हरयाणा, भारत — ) हे भारताचे माजी नौसेनाप्रमुख आहेत.

जुलै १९५६ मध्ये त्यांना भारतीय नौसेनेत कमिशन मिळाले. त्यांनी विविध भारतीय आरमारी नौकांवर काम केले. त्यांनी १९५७-५८ दरम्यान परदेशात कामगिरी. हे १९७९-८१ दरम्यान पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे डेप्युटी कमांडंट होते. त्यांनी काम केलेली इतर काही पदे - निदेशक, नौसेना मुख्यालय, दिल्ली (१९८२—८४); एसीएन्एस् , नौसेना मुख्यालय, दिल्ली (१९८४); फ्लॅग ऑफिसर कमांडिंग (ध्वजाधिकारी), पश्चिम आरमार (१९८६-८७), महाराष्ट्र एरिया मुंबई (१९८७-८८); डीजीडीपीएस् , संरक्षण मंत्र्यांचे, दिल्ली (१९८८—९०); एफ्ओसी-इन-सी, ईस्टर्न नेव्हल कमांड (१९९०—९२); नौसेना उपप्रमुख (१९९२-सप्टेंबर १९९३); नौसेनाप्रमुख (१ ऑक्टोबर १९९३—३० सप्टेंबर १९९६) वगैरे पदांवर त्यांनी कार्य केले आहे. इंडिया इंटरनॅशनल सेंटर, युनायटेड सर्व्हिसेस इन्स्टिट्युट ऑफ इंडिया, हिमालयन क्लबचे ते सदस्य होते.पीव्हीएस्एम्, एव्हीएस्एम् , वीर चक्र इ. पुरस्कार त्यांना मिळाले. 

कौटुंबिक माहिती[संपादन]

त्यांच्या वडिलांचे नाव धरमपाल सिंह आणि पत्नीचे नाव बिनू आहे. त्यांना दोन मुले आहेत.