विकिपीडिया चर्चा:विकिप्रकल्प भूगोल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सहयोगी सहभाग आणि भूगोल प्रकल्प आरंभण्याविषयी[संपादन]

नमस्कार अभिजित !

भूगोलविषयक लेखांची निर्मिती व संपादन तुम्ही सातत्याने करत आहात. तुमच प्रयत्न कौतुकास्पद आहेतच. परंतु राजकीय भूगोल या विषयाची व्याप्तीच एवढी प्रचंड आहे, की मराठी विकिपीडियावरील भूगोलविषयक किंवा किमान राजकीय-भूगोलविषयक लेखांना आकार देण्यासाठी व त्यातून दर्जेदार, माहितीपूर्ण लेख घडवण्यासाठी विकिप्रकल्प उभारून त्यातून विशिष्ट कामांचे प्रस्ताव तडीस नेणे (निवडक लेखांची सूची बनवून त्या लेखांमध्ये माहितीची भर टाकणे; त्या कामावर मेहनत घेणार्‍या कार्यगटाने कामांचे ठराविक टप्प्याने पाठपुरावा करत संकल्पित मुदतीत काम पुरे करणे; थोडक्यात प्रकल्प व्यवस्थापनाची कॉर्पोरेट तंत्रे योजून काम करणे) आवश्यक बनले आहे. विकिप्रकल्पाची संकल्पना जाणून घ्यायला विकिपीडिया:चरित्र प्रकल्प व त्यावरील विकिपीडिया:चरित्र प्रकल्प/प्रस्तावित कामे हे पान जरूर पाहा.

तुम्हांला या विषयात रुची आहे; त्यामुळे याबाबत पुढाकार घेऊन भूगोलविषयक किंवा किमान राजकीय भूगोलविषयक विकिप्रकल्प सुरू करण्याबाबत आपण प्रयत्न करू शकाल काय ? मलादेखील भूगोलविषयक लेखांमध्ये संपादने करायचा उत्साह असल्यामुळे आरंभीच्या काळात प्रकल्पव्यवस्थापनात व कार्यप्रस्तावांवर काम करण्यासाठी मी मदत करू शकतो. मात्र प्रचालकीय कामे, सर्वसाधारन व नैमित्तिक संपादने आणि मी पुढाकार घेऊन चालू केलेल्या विकिपीडिया:चरित्र प्रकल्प/प्रस्तावित कामे येथील कामांच्या व्यवस्थापनातून भूगोलविषयक विकिप्रकल्प चालू करायला काही जमले नाहीय. त्यामुळे ही कल्पना तुमच्यापाशी मांडून बघत आहे. तुमची मते जरूर कळवा.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०२:४१, ९ जुलै २०११ (UTC)

नमस्कार अभिजित ! कट्यारे (निनाद) यांच्या पुढाकाराखाली विकिपीडिया:विकिप्रकल्प हिंदू धर्म असा प्रकल्प नुकताच सुरू केलाय (म्हणजे प्रकल्प व त्याची कामे काही दिवसांत सुरू होतील; किमान आवश्यक पायाभूत सुविधा बनवल्या आहेत.). तुम्ही समन्वयक म्हणून काम पाहायला उत्सुक असाल, तर विकिप्रकल्प भूगोलदेखील आरंभता येईल. तुमचे विचार जरूर कळवा.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:१६, १ ऑगस्ट २०११ (UTC)

विकिप्रकल्पाचे फायदे[संपादन]

सध्या कदाचित दोन-तीन नेहमीचेच लोक असतील; पण कालांतराने ते वाढतीलही. विकिप्रकल्पाचा मुख्य फायदा असा की त्यामुळे लेखांचे पद्धतशीर विस्तारीकरण करणे सुलभ ठरते. करायच्या असलेल्या कामाचा पाठपुरावा करून सामूहिक पातळीवर व्यवस्थापन करणे सोपे ठरते. नाहीतर तुम्ही तुमची स्वतःची लेखांची सूची अनुसरणार, मी माझ्या अजेंड्याने काम करणार आणि मराठी विकिपीडियावर भूगोलविषयक लेखांची नमेकी सद्यस्थिती काय, त्यात कोणती कामे झाली, कोणती करणे अत्यावश्यक आहे, कोणती कामे आवश्यक नसली, तरीही पूरक आहेत इत्यादी गोष्टींचे भान राखणे अवघड ठरते. त्यामुळे विकिपीडियावरील आपल्या सर्व नेहमीच्या सदस्यांच्या प्रयत्नांची हळूहळू सहयोगी सांगड घालत पस्तीस हगारी लेखांच्या कोशप्रकल्पाच्या व्यवस्थापनाची घडी घालून घ्यायला हवी.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:४४, १ ऑगस्ट २०११ (UTC)

कोडे कसे सोडवायचे ?[संपादन]

संकल्पचे म्हणणे बरोबर आहे. पण तरी प्रकल्प सुरुकार्ण्यासाठी किमान स्वरुपाची विशिष्ट विषयावर रुची ठेवणारी काही मंडळी (डेडीकेटेड) असावी म्हणजे ते प्रकल्पास आकार देऊ शकतील. काही जुने आणि काही नवे अशी सांगड घातली तर दुग्ध शर्करा. आता हिंदू धर्म प्रकल्पासाठी ४ जुने आणि ४ नवीन अशी ८ लोक केवळ दिनविशेष ह्या कामा साठी सहयोग करायला आज तयार झाली आहे. तेव्हा प्रकल्प पहिले कि सदस्य पहिले हे कोडे कसे सोडवायचे ? मला वाटते मूळ नियमा प्रमाणे किमान ४ सदस्य तरी असावेत. अन्यथा आपणास भविष्यात आजारी प्रकल्पांचा वर्ग निर्माण करावा लागेल. राहुल देशमुख १६:४१, ३ ऑगस्ट २०११ (UTC)

नवीन प्रकल्प[संपादन]

मराठी विकिपीडियावर प्रकल्प बावन्नकशी पासून दालननिर्मितीपर्यंतचे अनेक प्रकल्प धूळ खात पडलेले आहेत. त्यात अजून एक भर घालण्यापेक्षा असलेल्या गोळा झालेल्या चमूने एखाद्या प्रकल्पावर थोडेसे का होईना काम करावे असे माझे मत आहे. याने प्रकल्पउभारणीसाठी काय लागते हे लक्षात येईल, प्रत्येकास आपापल्या संपादनक्षमतेबद्दल अधिक चांगला अंदाज येईल, टीमवर्क करण्याचा सराव होईल आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे अडगळीत पडलेल्या एखाद्यातरी प्रकल्पाची सुटका होईल.

अभय नातू १६:५९, ३ ऑगस्ट २०११ (UTC)

आजारी प्रकल्प[संपादन]

  • >>>>भूगोल प्रकल्पसंकल्प,
आपण सुचवल्याप्रमाणे भूगोल प्रकल्प सुरु करण्यास व पुढाकार घेण्यास माझी काहीच हरकत नाही. मला ह्या विषयात रुची आहे. प्रश्न असा आहे की इतर असे किती सदस्य आहेत जे ह्यामध्ये महत्वपूर्ण योगदान देउ शकतील. ४-५ जरी interested मेंबर्स असतील तरी चालेल परंतु केवळ आपण, मी व इतर नेहमीचेच लोक काम करणार असतील तर त्यासाठी प्रकल्प कशाला हवा असे वाटते. नाहीतरी सध्या लेख विस्तारणे (मंदगतीने का होईना) सुरूच आहे.
अभिजीत साठे १६:२६, १ ऑगस्ट २०११ (UTC)


  • प्रकल्प हिंदू धर्म हा संकल्पनि सुरु करूनच दिला आहे, निनाद त्याचे काम पाहायला तयार आहे तेव्हा ह्या कामास आता मोडता न घालता त्यावरच लक्ष केंद्रित करावे असे वाटते. अभिजितने व्यक्त केलेली शंका रास्त आहे. तसेच नवीन प्रकल्पाला काही किमान उद्दिष्ट आणि काही ढोबळ कालमर्यादा पण आखून ध्यावी आणि दर ठराविक कालावधीने प्रकल्पाच्या कामाचा आढावा चावडी प्रगतीवर मांडावा असे वाटते. ह्यामुळे आपण आजारी प्रकल्पाच्या आजारपणा पासून वाचू शकू. राहुल देशमुख १८:४५, ३ ऑगस्ट २०११ (UTC)
येथे माझा किंवा अभिजितचा उद्देश कामास मोडता घालण्याचा नसून पूर्वी झालेल्या चुका (खंडीभर प्रकल्प सुरू करुन ते अडगळीत टाकणे) नजरेस आणून देण्याचा आहे. नवीन प्रकल्प त्याच वाटेने जाऊ नये ही आशा. तसेच, नेहमीचे २-३ सदस्यच काम करणार असतील तर मग प्रकल्प वगैरेचे ओव्हरहेड कशाला?
असो. नवीन प्रकल्पाला शुभेच्छा आणि जमेल तशी मदत करण्याचे आश्वासन. तांत्रिक मदत लागल्यास तत्परतेने मदत करण्याचेही आश्वासन.
ही चर्चा चावडीवर लिहिल्याप्रमाणे प्रकल्प पानावर हलवता येईल?
अभय नातू २०:३६, ३ ऑगस्ट २०११ (UTC)

विकिप्रकल्प भूगोल[संपादन]

नमस्कार अभिजित ! विकिपीडिया:विकिप्रकल्प भूगोल हे पान बनवले आहे. आता विकिपीडिया:चरित्र प्रकल्प या विकिप्रकल्पात जशी विकिपीडिया:चरित्र प्रकल्प/चालू कामेविकिपीडिया:चरित्र प्रकल्प/प्रस्तावित कामे ही पाने बनवून तिथे एकेक कार्यप्रस्ताव (कामे/टास्क) नोंदवले आहेत, त्याप्रमाणे विकिपीडिया:विकिप्रकल्प भूगोल/चालू कामेविकिपीडिया:विकिप्रकल्प भूगोल/प्रस्तावित कामे येथे आपण आपल्या प्रस्तावित मनसुब्यानुसार काही लेखांची सूची बनवून कार्यप्रस्ताव म्हणून ठेवू शकता. मग त्या कामात काय-काय गोष्टी करायच्या आहेत, ते मुद्दे/निकष नोंदवून ढोबळमानाने प्रस्तावित मुदत लिहू शकता किंवा अन्य सदस्यांना आवाहन करून मुदतीविषयी मते मागवू शकता. नंतर काम चालू असताना त्याच कार्यप्रस्तावाच्या सारणीत झालेल्या कामांबद्दल अद्यतन टाकून एकंदरीत कामाचा नियमित पाठपुरावा करता येईल.

यासंदर्भात काही मदत लागल्यास जरूर कळवा.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:३८, ९ ऑगस्ट २०११ (UTC)


चर्चेचा मतितार्थ[संपादन]

वरील चर्चेचा मतितार्थ नवीन व्रकल्प सुरुकरूनये असा असताना (मला उमगलेला ) हा प्रकल्प सुरु करण्याचे कारण काय ? प्रकल्पास विरोध मुळीच नाही पण मग चर्चेचा आर्थ काय ? भविष्यातील धोरण काय ? राहुल देशमुख २३:११, ९ ऑगस्ट २०११ (UTC)