विकिपीडिया चर्चा:महाराष्ट्र शासन/विभाग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हे विभाग तीन आडवेच्या ऐवजी चार आडवे करता येतील का? तसे केल्याने दालनातील रियल इस्टेटचा वापर अधिक प्रभावीपणे होईल.

अभय नातू (चर्चा) १५:२८, २९ जुलै २०१५ (IST)

केले
अभय नातू (चर्चा) २१:३१, २९ जुलै २०१५ (IST)
ह्या विभागात खाली जगातील भौगोलिक प्रदेशांचे दुवे देण्याचे काय प्रयोजन आहे? - अभिजीत साठे (चर्चा) १२:५४, ३१ जुलै २०१५ (IST)


अभिजित,

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांनी त्याची अद्यावत माहिती विकिपिडीयावर टाकावी ह्या दृष्टीने शासना कडून एक परिपत्रक निघण्याची निकट भविष्यात श्याक्याता आहे. शासकीय विभागांना त्यांची अद्यावत माहिती सहज पणे विकिवर टाकता यावी ह्या उद्देशाने हे दालन बनवण्यात येत आहे. सदर दालन हे निर्माणाधीन अवस्थेत आहे आणि त्याची सुरुवात करतांना अभयने दालन भूगोल डवकवले होते त्या मुळे ते तसे दिसते आहे. हे दुवे टप्प्या टप्याने काम संपेपर्यत बदलत जातील असे वाटते. आपण हि ह्या प्रकल्पात सहभाग द्यावा. आपल्या सुचनांचे स्वागत आहे.

धन्यवाद

राहुल देशमुख १४:४३, ३१ जुलै २०१५ (IST)