Jump to content

विकिपीडिया:संपादनेथॉन/संपादनेथॉन ३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

२७ फेब्रुवारी (बुधवार), इ.स. २०१३ रोजी झालेल्या तिसर्‍या विकिपीडिया संपादनेथॉनेविषयीच्या माहितीच्या संकलनासाठी हे पान आहे.

वेळ व ठिकाण

[संपादन]

वेळ : बुधवार, २७ फेब्रुवारी, इ.स. २०१३ (ग्रीनीच प्रमाणवेळेनुसार
ठिकाण : मराठी विकिपीडिया
औचित्य : मराठी भाषा दिवस

म्हणजे काय ?

[संपादन]

संपादनेथॉन हा विकिपीडियावरील सदस्यांनी ठराविक दिवशी सर्वसाधारण सहमती झालेल्या उद्दिष्टांसाठी नियोजित विषयांवर अथवा नियोजित आराखड्यांनुसार संपादनांची मॅरेथॉन राबवण्याचा उपक्रम असतो. २०११ व २०१२ या वर्षांप्रमाणे हा उपक्रम न राबवता २०१३मध्ये फक्त या दिवसाच्या सुरुवातीची व शेवटची आकडेवारी गोळा करणे इतकेच या दिवसाचा कार्यक्रम आहे. कोणताही गाजावाजा न करता मराठी विकिपीडियावर किती संपादने होतात याचा अंदाज यातून येण्याची शक्यता आहे. इतरत्रः चालू असलेल्या चित्रदौडीमुळे त्यात (स्वागतार्ह) भर पडणे शक्य आहे.

पूर्वतयारी

[संपादन]

रोजच्या प्रमाणे संपादने करा.

उद्दिष्टे

[संपादन]

या संपादनेथॉनेची प्रमुख उद्दिष्टे खालीलप्रमाणे :

  • मराठी विकिपीडियनांनी पूर्ण संपादनेथॉनेच्या कालावधीत केलेल्या संपादनांची संख्या व अन्य आकडेवारी मोजून मराठी विकिपीडियाच्या (सध्याच्या क्षमतेनुसार) कमाल कामगिरीचे मूल्यमापन करणे.

नियोजित रूपरेषा

[संपादन]

दिवसाच्या सुरुवातीस व शेवटी आकडेवारी मोजणे

हे सुद्धा पाहा

[संपादन]