विकिपीडिया:विशेष सजगता/10

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून



विकिपीडिया नवीन लेखकांना आणि संपादकांना विश्वकोशीय संपादनात पुढाकार घेण्यास प्रोत्साहन देते. मराठी विकिपीडिया हि काही सर्वसाधारण वेबसाईट नाही, विकिपीडिया एक एनसायक्लोपिडीया विश्वकोश/ज्ञानकोश आहे. तो शक्यतोवर संदर्भ देऊनच बनवला जातो आणि नंतर विकिपीडियाच संदर्भ म्हणून वापरला जातो. त्यासाठी माहिती निव्वळ वस्तुनिष्ठ (फॅक्ट) असावी लागते. अलंकृत भाषा आणि विशेषणांच्या वापराने बऱ्याचदा वाचक, तो लेख किंवा विकिपीडिया एखाद्या व्यक्तीचे किंवा गटाचे समर्थन करतो(soft corner), असे समजू शकतो आणि लेखाची विश्वासार्हता कमी होण्याचा धोका असतो. विश्वासार्हता धोक्यात येण्याने फायद्याऐवजी नुकसानच अधिक होण्याची शक्यता बळावते. प्रत्येक वाचक स्वतःचे मत स्वतः बनवण्यास समर्थ असतो. अधिकात अधिक विश्वासार्ह माहिती वाचकास पुरविल्यास त्यामुळे त्यांचा विश्वास वाढतो.