विकिपीडिया:विकिप्रकल्प चित्रपट/शीर्षकलेखन संकेत
Appearance
मराठी विकिपीडियावरील चित्रपटांबद्दलच्या लेखांची शीर्षके निवडताना खालील संकेत पाळावेत
- चित्रपटलेखाचे शीर्षक शक्य तितके लहान असावे.
- चित्रपट लेखाचे शीर्षक १००% निःसंदिग्ध असावे.
याकरता खालील संकेत पाळले जावेत --
- जर चित्रपटाचे नाव पूर्णतः निःसंदिग्ध असेल तर फक्त नावाचा लेख असावा, उदा. कयामत से कयामत तक
- जर एकाच नावाचे एकाधिक चित्रपट दोन भाषांत, दोन वर्षी, दोन माध्यमांत किंवा इतर कोणत्याही बाबतीत संदिग्ध असेल तर ते निःसंदिग्ध होण्यासाठी शीर्षकात वाढ करावी, उदा. ट्वेल्व अँग्री मेन (१९५७ चित्रपट), ट्वेल्व अँग्री मेन (१९९७ चित्रपट) किंवा घनचक्कर (मराठी चित्रपट), घनचक्कर (हिंदी चित्रपट), टू किल अ मॉकिंगबर्ड (कादंबरी), टू किल अ मॉकिंगबर्ड (चित्रपट), इ.
- जेथे नुसते नाव संदिग्ध आहे तेथे निःसंदिग्धीकरण पाने तयार करावीत किंवा प्रत्येक लेखात गल्लत साचा किंवा हे सुद्धा पहा या उपशीर्षकाखाली इतर शीर्षकांचा उल्लेख करावा.
- अधिक निःसंदिग्धीकरण करणाऱ्या शीर्षकांपासून पुनर्निर्देशने असण्यास काहीच हरकत नाही, किंबहुना तशी करावीत, उदा. ट्वेल्व अँग्री मेन (१९५७ चित्रपट), ट्वेल्व अँग्री मेन (१९५७ इंग्लिश चित्रपट), ट्वेल्व अँग्री मेन (इंग्लिश १९५७ चित्रपट), ...