Jump to content

विकिपीडिया:मासिक सदर/नोव्हेंबर २०११

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विंडोज ७ची मराठी आवृत्ती

मायक्रोसॉफ्ट विंडोज इंग्लिश: Microsoft Windows) ही मायक्रोसॉफ्ट या कंपनीने वितरित केलेली संगणक संचालन प्रणाली (ऑपरेटिंग सिस्टम) व ग्राफिकल[मराठी शब्द सुचवा] सदस्य व्यक्तिरेखा आहे. मायक्रोसॉफ्टने ग्राफिकल सदस्य व्यक्तिरेखेच्या वाढत्या प्रतिसादास उत्तर म्हणून एमएस-डॉसचे विस्तारक म्हणून २० नोव्हेंबर १९८५ रोजी विंडोज नामक संचालन एन्व्हिरॉन्मेंट[मराठी शब्द सुचवा] आणले. १९८४ साली प्रकाशित झालेल्या अ‍ॅपलच्या मॅकिंटॉशला मागे टाकत विंडोजने खासगी संगणकांचा बाजार काबीज केला आहे. ऑक्टोबर २००९ च्या माहितीनुसार ग्राहक संचालन प्रणालीच्या बाजारात ८२.५% वाटा विंडोजचा आहे. विंडोजच्या सर्वात नवीन आवृत्त्या: खासगी संगणकासाठी (पर्सनल कम्प्युटर) विंडोज ७, सर्व्हरसाठी विंडोज सर्व्हर २००८ आरटूमोबाईल फोनसाठी विंडोज फोन ७ ह्या विंडोजच्या सर्वात नवीन आवृत्त्या आहेत.

मायक्रोसॉफ्टने तिच्या संचालन प्रणाल्यांमध्ये दोन समांतर मार्ग घेतले आहेत: एक व्यावसायिक आयटी वापरकर्त्यासाठी तर दुसरा घरगुती वापरकर्त्यासाठी. दोन्ही मार्गांपैकी गृह-आवृत्त्यांमध्ये जास्त मल्टिमीडिया समर्थन पण नेटवर्किंग व सुरक्षिततेत कमी कार्यक्षमता तर व्यावसायिक आवृत्त्यांत प्राथमिक मल्टिमीडिया पण उत्तम नेटवर्किंग व सुरक्षितता असते.

नोव्हेंबर १९८५ मध्ये प्रकाशित झालेली विंडोज १.० ही विंडोजची पहिली आवृत्ती होती. अ‍ॅपलशी स्पर्धा करण्यासाठी असलेल्या या संचालन प्रणालीस कमी लोकप्रियता व कार्यक्षमतेचा अभाव लाभला. ती परिपूर्ण संचालन प्रणाली नव्हती; किंबहुना ती एमएस-डॉसला विस्तारत होती. मासिक सदर/नोव्हेंबर २०११ २.० ची लोकप्रियता पूर्वाधिकार्‍याहून किंचित जास्त होती. विंडोज २.०३ (प्रकाशन दिनांक जानेवारी १९८८) ने वापरकर्त्यांस चौकटींना एकमेकांच्यावर येऊ देण्याची मुभा दिली त्यामुळे अ‍ॅपलच्या प्रताधिकारांचे उल्लंघन झाले.

१९९० मध्ये प्रकाशित झालेली २ दशलक्षांहून जास्त प्रती पहिल्या सहा महिन्यांत विकल्या जाणारी विंडोज ३.० ही विस्तृत व्यापारी यश मिळवणारी पहिली आवृत्ती होती. तिच्यामध्ये सदस्य व्यक्तिरेखेत व एकाच वेळी अनेक कामे करण्याच्या क्षमतेमध्ये सुधारणा घडण्यात आल्या होत्या. विंडोज ३.१ ही तिची उत्तराधिकारी मार्च १, १९९२ रोजी सामान्यपणे उपलब्ध झाली.

जानेवारी ३०, २००७ रोजी विंडोज व्हिस्टा प्रकाशित झाले. त्याच्यामध्ये काही नवीन सुविधा होत्या, तसेच पुनर्निर्मित केले गेलेले शेल व सदस्य व्यक्तिरेखा, व काही प्रमाणात सुरक्षेवर लक्ष केंद्रित केले होते. ते वेगवेगळ्या आवृत्त्यांत उपलब्ध आहे. विंडोज व्हिस्टा हा चिकित्सेचा विषय बनून राहिला आहे.

ऑक्टोबर २२, २००९ रोजी विंडोज ७ प्रकाशित झाली. विंडोज ७ ने मल्टि-टच समर्थन, नवीन टास्कबारसहित पुनर्निर्मित विंडोज शेल अशा नवीन सुविधा दिल्या.

पुढे वाचा...