Jump to content

विकिपीडिया:धूळपाटी/भडास (कादंबरी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(विकिपीडिया:धूळपाटी/भडास या पानावरून पुनर्निर्देशित)
या लेखातील किंवा विभागातील काही मजकुर जाहिरातसदृष्य आहे.अथवा विशीष्ट वस्तुचे मुल्य नमूद केले गेले आहे. कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे.
मराठी विकिपीडिया एक विश्वकोश आहे,त्यातील माहिती निष्पक्षता विश्वासार्हता आणि दर्जा जपण्याच्या दृष्टीने, जाहिरातसदृष्य मजकुर असणे,विशीष्ट वस्तुंच्या किमती नमूद करणे हे विकिपीडियाच्या उद्देश व आधारस्तंभ यांस सुसंगत ठरत नाही. विकिपीडिया कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्‍तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे साधन नाही. अर्थात संबधित ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असलेल्या माहितीची संदर्भासहीत तर्कसुसंगत योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही.

मजकुर वगळणे किंवा त्याचे विकिकरण करणे प्रस्तावित आहे. हा साचा एखाद्या लेखात आढळल्यास, लवकरात लवकर सदरहू जाहिरात काढून टाकावी अथवा मजकुरात सुधारणा करावी आणि नंतर {{जाहिरात}} हा साचा लेखातून काढून टाकावा.



आपल्या सहकार्या बद्दल धन्यवाद ! कृपया या संबंधीची चर्चा, या लेखाचे चर्चापानावर पहावी.

संदेश = कृपया या बाबतचे आपले मत या लेखाचे चर्चापानावर नोंदवा.

भडास ही डॉ. अनिल सपकाळ यांची कादंबरी. डॉ. अनिल सपकाळ हे साहित्य, संस्कृती, कलामाध्यमे आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये सक्रीय आहेत. ते २००० सालच्या महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवातील सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचे पारितोषिक विजेत्या ‘गाभारा’ या चित्रपटाचे कथा-पटकथा-संवाद लेखक, शांताबाई दाणी यांच्या जीवनावरील ‘शांताबाई’ या माहितीपटाचे लेखक-दिग्दर्शक, ‘भारतीय कविताएँ’ १९८९-१९९१ या कवितासंग्रहात कवितांचा समावेश झालेल्या ‘पारंब्या’ या काव्यसंग्रहाचे कवी आहेत. भडास ही मराठीतील सर्वसामान्य वाचकांबरोबरच साहित्य क्षेत्रातील जाणकारांनीही या कादंबरीचे महत्त्व अधोरेखित केलेले आहे. ह्या कादंबरीला महाराष्ट्र अनुवाद परिषद आणि तुका म्हणे या लघु-अनियतकालिकाच्यावतीने ‘तुका म्हणे’ हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. मराठी साहित्यामध्ये कादंबरी साहित्य प्रकारात ज्या महत्त्वाच्या कादम्बऱ्या आहेत त्यामध्ये भडास या कादंबरीचा समावेश होतो.


भडासविषयी प्रतिक्रिया

[संपादन]

"भडास" विषयी महत्त्वाच्या काही प्रतिक्रिया -

कादंबरी मला आवडली. आपल्या कादंबरीच्या परंपरेला काहीतरी नवे दृश्य दाखवणारी आहे. एकाच्या जीवाची तगमग सुरुवातीपासून शेवटपर्यंत मनाची पकड घेते.

... भालचंद्र नेमाडे (Bhalchandra Nemade)

‘भडास’ मराठीतील नव्या दमाची महत्त्वाची साहित्यकृती असून विविध मेटॅफरचा ही कादंबरी शोध घेते. कामूच्या ‘आऊटसायडर’ मधला ‘आऊटबर्स्ट’ जसा उभा राहतो तसा प्रत्यय येथे येतो.

... राम बापट

या कादंबरीचे निवेदनतंत्र आणि कादंबरीत उभे राहणारे गावगाडयाचे पूर्ण चित्र या दोन्ही गोष्टींमुळे ही कादंबरी मला महत्त्वाची वाटते. माझ्यासारख्या लिहिणाऱ्यालाही वाटतं की, अरे आपण आपल्या ज्या काही लेखनशक्यता आहेत त्या एकदा आपल्यापरीने आपल्यात शोधणं, तपासणं आवश्यक आहे ही माझी प्रतिक्रिया ‘भडास’ या कादंबरीच्या वाचनानं माझ्या मनातही सुरु झाली, हे ‘भडास’ चं यश आहे.

... प्रा. डॉ. राजन गवस.

‘भडास’ मध्ये संस्कृतीचं, विविध समाजाचं जे चित्र आहे त्या चित्रामध्ये उदात्तीकरणाचा लवलेशही नाही हे अत्यंत महत्वाचं. ज्या अलिप्तपणे आणि ज्या तटस्थपणे गावातील जो सवर्ण समाज आहे, त्याची चिकित्सा केली पाहिजे, त्याच तटस्थपणे गावातील महारवडयाचीही चिकित्सा केलेली आहे.

... प्रा. डॉ. हरिश्चंद्र थोरात.[]

परंपरा नाकारण्याची परंपरा ‘भडास’ मध्ये येते. अनिल सपकाळ यांच्या ‘भडास’ने दलित साहित्याला नवे वळण देण्याचा प्रयत्न केला आहे.

... प्रा. डॉ. शरणकुमार लिंबाळे. Sharankumar Limbale

नव्या आधुनिक वाङ्मयाच्या वेगवेगळ्या रूपाच्या क्षमता समजावून घेऊन त्यांचा उपयोग आपल्या लेखनात अतिशय चांगल्या पद्धतीने डॉ. अनिल करत आहेत हे ‘भडास’ च्या निमित्ताने मला मोलाचे वाटते.

... प्रा. अविनाश सप्रे.[]

समृद्ध भाषिक वैशिष्ट्याने संपृक्त झालेली ही कादंबरी आहे. अन्य दलित कादंबऱ्यांपेक्षा ही कादंबरी वेगळा जीवनआशय व्यक्त करणारी आहे.

... डॉ. विश्वनाथ शिंदे

‘भडास’ वाचली. भाषा समजत नव्हती. वाचताना अडचण येत होती. बरेच श्रम पडलेत, पण त्या श्रमाचे चीज झाले. कादंबरी छोटेखानी, ‘भिकाऱ्या’विषयी सांगणारी. तसा विचार केला तर आपण सारेच ‘भिकाऱ्या’ आहोत.

... प्रेमानंद गज्वी

एकूण मला जाणवलं कथनात्मक शैलीच्या अंगभूत उर्जेला तुमचं भिडू पाहणं. एका अर्थाने चांगल्या कादंबरीकाराने गंभीरपणे स्वतःची ताकद अजमावण्याचाच हा शोध. अधिक महत्त्वाचं वाटलं, या सगळ्या प्रोसेसमध्ये आशयाचं केंद्रतत्त्व कुठेही विचलित न होणं. अगदी ‘भडास’ जिथे संपते त्या शेवटपर्यंत. विशिष्ट इझमचे ठसे आणि शिक्के या दृष्टीने तुम्ही व्यक्तीरेखा ‘वापरत’ नाही म्हणून मला ‘भडास’ चा शेवट अत्यंत ‘ओरिजिनल’ वाटला. विचारप्रणालीचा (जी सेक्टेरीयन असण्याच्या पलीकडे नेते) स्वच्छ आणि थेट प्रकाशात माणूस असणं म्हणजे नेमकं काय काय असणं आणि काय काय असू शकणं, ऐतिहासिक आणि समकालीन संदर्भात यातले अंतर्विरोध अधोरेखित करणारी ‘भडास’ ही एक महत्त्वाची सांस्कृतिक कृती ठरावी.

... प्रज्ञा लोखंडे (Pradnya Daya Pawar)

बोलीचा आधार घेत तू जे व्यक्त केले आहेस, त्यांत तुझ्या अभिव्यक्तीच्या सामर्थ्याचे दर्शन आहे.

... सतीश काळसेकर.[]

‘भडास’ ही माझ्या अंतरंगात झिरपत जाणारी कलाकृती आहे. देव नाकारण्याचा विद्रोह खूपच प्रभावीपणे मांडला आहे. ग्रामीण भाषेतही खूप सूक्ष्म, प्रयोगशील लिहिता येते याचा प्रत्यय ‘भडास’ वाचताना येतो.

... सदानंद देशमुख (Sadanand Deshmukh)

तिसऱ्या पिढीचे कादंबरीकार म्हणून डॉ. अनिल यांचे महत्त्व ‘भडास’मुळे अधिकच गडद होते.

... प्रा. डॉ. कृष्ण किरवले.[]


भाषेची अडचण असतानासुद्धा तिच्यातील सृजन जाणवल्याशिवाय राहत नाही. त्याशिवाय तिचे सामाजिक व्यंगावर subtle पणे बोट ठेवणे, तिचा कल्पनाविलास, कथानकातील संरचना, लिखाणातील (narration) सहजता यासारख्या साहित्यिक गुणांमुळे ‘भडास’ मराठी साहित्यात खचितच उल्लेख्खनीय ठरेल. किंबहुना अलीकडच्या मराठी साहित्यात ती एक सृजनात्मक आदर्श ठरेल.

... डॉ. आनंद तेलतुंबडे. (Anand Teltumbde)

संदर्भ

[संपादन]