विकिपीडिया चर्चा:धूळपाटी/भडास (कादंबरी)
भडास ह्या कादंबरीस प्रथमदर्शनी ज्ञानकोशीय उल्लेखनीयता असण्याची शक्यता असावी असे वाटते. परंतु ज्ञानकोशात स्वतंत्र लेख असण्याच्या दृष्टीने तसे वाटणे पुरेसे ठरत नाही. ज्ञानकोशीय लेखांना यासाठी अधिक कसोट्यांमधून जावे लागते.
सध्याच्या लेखात 'साहित्य क्षेत्रातील जाणकारांनीही या कादंबरीचे महत्त्व अधोरेखित केले असल्याचे नमुद केले' असल्याचे नमुद केले आहे, हि गोष्ट जमेची असलीतरी वेळीच हे स्पष्ट केलेले बरे की ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेसाठी कादंबरीचे अधोरेखीत होणे महत्वाचे आहे, आणि काय अधोरेखीत केले आहे हे महत्वाचे आहे, संदर्भ नमुद करण्यासाठी कुणी, केव्हा आणि कुठे अधोरेखीत केले याची माहिती ज्ञानकोशीय लेखातून दिली जाणे अत्यंत महत्वाचे आहेच; पण त्याच वेळी अधोरेखीत करणाऱ्या व्यक्तीचे जाणकार असने उपयूक्त असले तरीही अत्यावश्यक नाही. गीतेचा भावार्थ अनुवाद करणारे ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वरी लिहिली जाण्यापुर्वी जाणकार म्हणून परिचीतही नव्हते, समजा ज्ञानेश्वर गीतेवरील जाणकार म्हणून विशेष परिचीत नाहीत पण त्यांनी त्यांची गीतेवरील टिका प्रकाशित केलेली आहे. 'गीता' या लेख विषयाची ज्ञानकोशीय दखल घेताना गीता अधोरेखीत केली गेली आणि त्यातील काय अधोरेखीत केले हे महत्वाचे आहे, ज्ञानकोशीय दखल घेताना कुणी म्हणजे ज्ञानेश्वरांनी (सर्वसामान्य व्यक्ती गृहीतधरून सुद्धा), केव्हा: १३व्या शकतात आणि कुठे त्यांच्या भावार्थ दिपीका या ग्रंथातून अधोरेखीत केले हे ज्ञानकोशासाठी पुरेसे आहे, (ज्ञानेश्वरांचे गीतेवरील भाष्यकार अथवा जाणकार म्हणून ज्ञानेश्वरी लेखनाच्या उतरकाळात स्विकारले जाणे हे ज्ञानकोशीय नोंदीसाठी उपयूक्त आहे अत्यावश्यक नाही) ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी सध्या आहेत तेवढे प्रसिद्ध न राहता अनुल्लेखीत राहीले असते तरीही गीतेवरील ज्ञानकोशीय लेख लिहिताना ज्ञानकोशीय संपादकासाठी ज्ञानेश्वरांनी गीता अधोरेखीत केली आहे, गीते बद्दल काय अधोरेखीत केले आहे आणि ज्ञानकोशात दखल घेण्या इतपत ज्ञानेश्वरांच्या नोंदी आणि भाष्य पुरेसे तर्कसुसंसगत आहे का हे महत्वाचे आहे.
या लेखातील नमुद चारही संदर्भांची सध्याची स्थिती पाहता, प्रा. डॉ. हरिश्चंद्र थोरात, प्रा. अविनाश सप्रे, सतीश काळसेकर, प्रा. डॉ. कृष्ण किरवले कोण आहेत याची माहिती मिळते (या सर्व व्यक्ती कोण आहेत हे ज्ञानकोशीय लेखाच्या दृष्टीने केवळ संदर्भ नमुद करण्याच्यासाठी ऊपयूक्त आहेत, या विशीष्ट लेखापुरते त्यांनी अधोरेखीते विषय लेखाशी संबंधीत आहेत का हे पुरेसे आहे, अबकड व्यक्तीची पार्श्वभूमी काय आहे यावर ज्ञानकोशीय उल्लेखनीयता अवलंबून नाही), काय अधोरेखीत केले याची माहितीही अल्पांशानेका होईना मिळते आहे; केव्हा आणि कुठे (पत्र, वृत्तपत्र, पुस्तक, अथवा समारंभ?) अधोरेखीत केले याची माहिती या लेखात दिलेल्या संदर्भातून मिळत नसल्याने या लेखाची स्थिती जराशी विचीत्र झाली आहे. काही उपयूक्त माहिती आहे केव्हा आणि कुठे याची माहिती नसल्याने त्याबद्दल दुजोरा नसल्यामुळे ती माहिती परिच्छेद लेखनासाठी विश्वासार्ह म्हणून वापरताना मर्यादा येतात आणि सारा मजकुर केवळ जाहीरात उद्देशाने लिहिल्या सारखा वाटतो. दिग्गज व्यक्तींची नावे केवळ जाहीरातीसाठी वापरली असे होते.
सतीश काळसेकर, यांच्या "बोलीचा आधार घेत तू जे व्यक्त केले आहेस, त्यांत तुझ्या अभिव्यक्तीच्या सामर्थ्याचे दर्शन आहे." वाक्यातून लेखकाच व्यक्तीगत कौतुक आहे, सतीश काळसेकर ह्यांनी असे केव्हा आणि कुठे म्हटले याचा संदर्भ असेल तर त्यांच्या या कौतुकाची दखल अनिल तानाजी सपकाळ या लेखातून अवश्य घेता येईल. सतीश काळसेकरांचे अवतरणाचे मुल्य मुख्यत्वे एका प्रमाणपत्राचे सर्टीफिकेटचे वाटते 'भडास' या कादंबरीतून काय अधोरेखीत झाल याची काहीच माहिती मिळत नाही. असाच काहीसा प्रकार प्रा. डॉ. कृष्ण किरवले यांच्या प्रतिक्रीयेचाही आहे, "तिसऱ्या पिढीचे कादंबरीकार म्हणून डॉ. अनिल यांचे महत्त्व ‘भडास’मुळे अधिकच गडद होते." इथे त्यांना ठळक होते म्हणावयाचे असावे पण, मुख्य म्हणजे हेही अवतरण प्रमाणपत्र सर्टीफिकेट समकक्ष आणि केव्हा आणि कुठे याचा संदर्भ मिळाल्यास अनिल तानाजी सपकाळ या व्यक्ती विषयक लेखातील साहित्यिक कारकीर्द विभागातून घेता येईल. 'भडास' कादंबरीवरील ज्ञानकोशीय लेख हा अनिल तानाजी सपकाळ यांच्या साहित्यिक कारकिर्दीचा आढावा नव्हे म्हणून या दोन्ही प्रतिक्रीया भडास (कादंबरी) या ज्ञानकोशीय लेखासाठी गौण ठरतात.
सदानंद देशमुखांची प्रतिक्रीया अभ्यासली तर "...देव नाकारण्याचा विद्रोह खूपच प्रभावीपणे मांडला आहे. ग्रामीण भाषेतही खूप सूक्ष्म, प्रयोगशील लिहिता येते याचा प्रत्यय ‘भडास’ वाचताना येतो." याची दखल (त्यांनी तसे केव्हा आणि कुठे म्हटले आहे ह्याचा संदर्भ मिळाल्यास) 'भडास' कादंबरीबद्दलच्या ज्ञानकोशीय लेखातून निश्चित घेता येते, पण त्याच वेळी... "भडास’ ही माझ्या अंतरंगात झिरपत जाणारी कलाकृती आहे." हा सदानंद देशमुख यांच्या वाक्याचा भाग त्यांचा व्यक्तीगत अनुभव आहे सदानंद देशमुखांच्या व्यक्तीगत अनुभवाची ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेवर मर्यादा येऊन वाक्याचा तेवढा भाग ज्ञानकोशीय लेखात ठेवणे साशंकीत होते. सदानंद देशमुखांनी "भडास’ ही वाचकांच्या अंतरंगात झिरपत जाणारी कलाकृती आहे." इतरांचा दुजोरा देऊन असे लिहिले त्याला अजून एखादा दुजोरा मिळाला तर "भडास’ ही वाचकांच्या अंतरंगात झिरपत जाणारी कलाकृती आहे." या वाक्यास ज्ञानकोशीय उल्लेखनीयता प्राप्त होऊ शकते अन्यथा असे वाक्य ज्ञानकोशात ठेवण्यावर मर्यादा येतात.
संदर्भ उपलब्ध झाले तर
[संपादन]- व्यक्तींनी केव्हा आणि कुठे उल्लेख केले आहेत याचे संदर्भ उपलब्ध झालेतर खालील भाग भडास (कादंबरी) ज्ञानकोशीय लेखात घेता येऊ शकेल
- "भडास ही कादंबरी छोटेखानी, ‘भिकाऱ्या’विषयी सांगणारी आहे. प्रेमानंद गज्वी यांच्या मतानुसार तसा विचार केला तर सारेच ‘भिकाऱ्या’ असतात. (असे प्रेमानंद गज्वी केव्हा आणि कुठे म्हणाले [ संदर्भ हवा ])
भालचंद्र नेमाडे यांच्या मतानुसार एकाच्या जीवाची तगमग सुरुवातीपासून शेवटपर्यंत मनाची पकड घेते.(असे भालचंद्र नेमाडे केव्हा आणि कुठे म्हणाले [ संदर्भ हवा ]) प्रा. डॉ. हरिश्चंद्र थोरात यांच्यामते ‘भडास’ मध्ये संस्कृतीचं, विविध समाजाचं जे चित्र आहे त्या चित्रामध्ये उदात्तीकरणाचा लवलेशही नाही हे अत्यंत महत्वाचं आहे, प्रा. डॉ. शरणकुमार लिंबाळेयांच्या मते परंपरा नाकारण्याची परंपरा ‘भडास’ मध्ये येते. ‘भडास’ने दलित साहित्याला नवे वळण देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रा. डॉ. हरिश्चंद्र थोरात यांच्या मतानुसार कादंबरीत दाखवलेला गावातील जो सवर्ण समाज आहे, त्याची चिकित्सा केली आहे , त्याच तटस्थपणे गावातील महारवडयाचीही चिकित्सा केलेली आहे. (असे प्रा. डॉ. हरिश्चंद्र थोरात केव्हा आणि कुठे म्हणाले [ संदर्भ हवा ]) सदानंद देशमुख यांच्या मते कादंबरीतून देव नाकारण्याचा विद्रोह खूपच प्रभावीपणे मांडला आहे (असे प्रा. डॉ. सदानंद देशमुख केव्हा आणि कुठे म्हणाले [ संदर्भ हवा ])
प्रज्ञा लोखंडे यांच्या मते ऐतिहासिक आणि समकालीन संदर्भात यातले अंतर्विरोध अधोरेखित करणारी ‘भडास’ ही एक महत्त्वाची सांस्कृतिक कृती आहे. विचारप्रणालीचा (जी सेक्टेरीयन असण्याच्या पलीकडे नेते) स्वच्छ आणि थेट प्रकाशात माणूस असणं म्हणजे नेमकं काय काय असणं आणि काय काय असू शकणं हे या कादंबरीतून अधोरेखीत होते. (असे प्रज्ञा लोखंडे केव्हा आणि कुठे म्हणाले [ संदर्भ हवा ])
शैली
[संपादन]डॉ. आनंद तेलतुंबडे यांच्या मतानुसार 'सामाजिक व्यंगावर subtle पणे बोट ठेवणे, तिचा कल्पनाविलास, कथानकातील संरचना, लिखाणातील (narration) सहजता यासारख्या साहित्यिक गुणांमुळे ‘भडास’ कादंबरी मराठी साहित्यात खचितच उल्लेख्खनीय ठरते, किंबहुना अलीकडच्या मराठी साहित्यात ती एक सृजनात्मक आदर्श ठरेल. (असे डॉ. आनंद तेलतुंबडे केव्हा आणि कुठे म्हणाले [ संदर्भ हवा ]) प्रज्ञा लोखंडे यांच्या मते कादंबरीकार स्वत:च्या कथा शैलीस आणि क्षमतेस अजमावताना सुद्धा भडास कादंबरी संपेपर्यंत आशयाचं केंद्रतत्त्व कुठेही विचलित होत नाही, कादंबरीचा शेवट ओरीजनल वाटतो.
प्रा. डॉ. राजन गवस यांच्या मतानुसार कादंबरीचे निवेदनतंत्र आणि कादंबरीत उभे राहणारे गावगाडयाचे पूर्ण चित्र या दोन्ही गोष्टींमुळे ही कादंबरी उल्लेखनीय ठरते. राम बापट यांच्या मतानुसार भडास’ मराठीतील नव्या दमाची महत्त्वाची साहित्यकृती असून विविध मेटॅफरचा ही कादंबरी शोध घेते. कामूच्या ‘आऊटसायडर’ मधला ‘आऊटबर्स्ट’ जसा उभा राहतो तसा प्रत्यय येथे येतो. डॉ. आनंद तेलतुंबडे कादंबरीतील सृजनाची नोंद घेतानाच कादंबरीत भाषेची अडचण असल्याचे सुद्धा नोंदवतात, प्रेमानंद गज्वी यांच्या मतेसुद्धा भाषा समजण्यास अडचण येते श्रम पडतात (असे सदानंद देशमुख केव्हा आणि कुठे म्हणाले [ संदर्भ हवा ]). डॉ. विश्वनाथ शिंदे, सदानंद देशमुख आणि सतीश काळसेकर यांच्या मतानुसार कादंबरी समृद्ध भाषिक वैशिष्ट्याने संपृक्त असून भडास कादंबरी वाचताना ग्रामीण बोली भाषेतही खूप सूक्ष्म, प्रयोगशीलपणे लेखन झाल्याने लेखकाच्या अभिव्यक्तीच्या सामर्थ्याचे दर्शन होते. (असे डॉ. विश्वनाथ शिंदे, सदानंद देशमुख आणि सतीश काळसेकर केव्हा आणि कुठे म्हणाले [ संदर्भ हवा ])