विकिपीडिया:उदयोन्मुख लेख/२२ जुलै २०१२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
"गॅलॅक्टिक सिव्हिलायझेशन्स २: ड्रेड लॉर्ड्‌स" खेळाच्या सीडीचे बाह्यावरण
"गॅलॅक्टिक सिव्हिलायझेशन्स २: ड्रेड लॉर्ड्‌स" खेळाच्या सीडीचे बाह्यावरण

गॅलॅक्टिक सिव्हिलायझेशन्स २: ड्रेड लॉर्ड्‌स (इंग्रजी: Galactic Civilizations II: Dread Lords, लघुनाम GalCiv II किंवा GalCiv2) हा स्टारडॉक या कंपनीचा एक दृश्य खेळ आहे. तो उत्तर अमेरिकेत फेब्रुवारी २१, इ.स. २००६ रोजी प्रकाशित झाला. त्याचे पहिले विस्तारक, डार्क अवतार फेब्रुवारी, इ.स. २००७ मध्ये प्रकाशित झाले. दुसरे विस्तारक, ट्वायलाइट ऑफ द आर्नोर हे एप्रिल, इ.स. २००८ मध्ये प्रकाशित झाले.

गॅलॅक्टिक सिव्हिलायझेशन्स २ ची कथा तेविसाव्या शतकाच्या पार्श्वभूमीवर घडते, जेव्हा अनेक ग्रहांवरील (पृथ्वीसहित) जीव हे थोडे-थोडे ग्रह जिंकत संपूर्ण आकाशगंगा बळाने, कूटनीतीने, प्रभावाने आणि तंत्रज्ञानाने जिंकून घेण्यासाठी धडपड करत असतात. हा खेळ एक-खेळाडू अनुभवाला लक्ष्य करतो. यात एक "कँपेन" हा खेळण्याचा प्रकार व एक "सँडबॉक्स" खेळण्याचा प्रकार आहे. हा खेळ त्याच्या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे उल्लेखनीय आहे. या खेळाला सामान्य व्यावसायिक यश लाभले व त्याने अनेक "एडिटर्स चॉइस" पुरस्कार मिळवले. स्टारडॉकने एक वेगळी वितरण पद्धत निवडली जिच्यामुळे या खेळाच्या अनधिकृत प्रती काढता येत नाहीत.

(पुढे वाचा...)