गॅलॅक्टिक सिव्हिलायझेशन्स २: डार्क अवतार
गॅलॅक्टिक सिव्हिलायझेशन्स २: डार्क अवतार | |
---|---|
विकासक | स्टारडॉक |
प्रकाशक | स्टारडॉक |
रचनाकार | ब्रॅड वार्डेल |
इंजिन | लिबथ्रीडी, क्युमक्वात |
प्लॅटफॉर्म | मायक्रोसॉफ्ट विंडोज |
प्रकाशन दिनांक | फेब्रुवारी ८, २००७ |
नवीनतम आवृत्ती | २.०१ |
खेळण्याचे प्रकार | एक-खेळाडू |
मूल्यांकन | इएसआरबी: इ१०+ |
माध्यमे/वितरण | सीडी, उतरवणे |
प्रणाली आवश्यकता |
गॅलॅक्टिक सिव्हिलायझेशन्स २: डार्क अवतार (इंग्रजी: Galactic Civilizations II: Dark Avatar) हे स्टारडॉक या कंपनीच्या गॅलॅक्टिक सिव्हिलायझेशन्स २: ड्रेड लॉर्ड्स या खेळाचे एक विस्तारक आहे. ते फेब्रुवारी २००७ मध्ये प्रकाशित झाले.
कथारेषा
[संपादन]ड्रेन्जिन साम्राज्याने बरीचशी दीर्घिका जिंकून मानवांच्या प्रदेशापैकी पृथ्वी सोडून बाकी सर्व प्रदेश जिंकला आहे. पृथ्वीवासियांनी त्यांच्या ग्रहाभोवती अभेद्य कवच उभे करून आपला बचाव केला आहे. दुसरीकडे, ड्रेन्जिनांनी आपले लक्ष जिंकलेल्या इतर संस्कृतींकडे केंद्रित केले आहे. क्रिंदर इ'अगोल, (इंग्रजी: Krindar I'Agohl), कोराथ सैन्यगटाचा नेता, जो सैन्यगट पृथ्वीवासीयांचा मुकाबला करायलादेखील घाबरत असे, त्याने सर्व ड्रेन्जिन नसलेल्या जीवांना नष्ट करायची तीव्र इच्छा व्यक्त केली. पूर्वी जे कोराथविरुद्ध बचावले त्यातील नंतर कुणीही वाचले नाहीत.