Jump to content

विकिपीडिया:उदयोन्मुख लेख/१६ ऑक्टोबर २०१०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (१४ एप्रिल, इ.स. १८९१; महू, मध्य प्रदेश - ६ डिसेंबर, इ.स. १९५६; दिल्ली) हे मराठी, भारतीय कायदेतज्ज्ञ व राजकारणी होते. स्वातंत्र्योत्तर काळात भारताची राज्यघटना बनवणार्‍या मसुदासमितीचे ते अध्यक्ष होते. सामाजिक आणि अर्थिक अडचणींवर मात करून महाविद्यालयीन पदवी मिळवणाऱ्या दलितांच्या पहिल्या पिढीमधील ते एक होते. दलितांच्या उद्धारासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. इ.स. १९९० साली भारतीय शासनाने त्यांना भारतरत्न या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवले. (पुढे वाचा...)