Jump to content

वायुधारित वीजनिर्मिती प्रकल्प

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वायूधारित वीजनिर्मिती प्रकल्प हा वीजनिर्मितीचा व्यवहार्य पर्याय आहे असे मानले जाते. या ऊर्जा प्रकल्पामध्ये नैसर्गिक वायूच्या उच्चदाबावरील ज्वलनांतून उष्णतेची निर्मिती केली जाते. वायुजनित्रांत (इंग्लिश: Gas Turbo Generator) घडणाऱ्या या प्रक्रियेतून वीजेची निर्मिती होते. याच प्रक्रियेतून बाहेर पडणाऱ्या उत्सर्जित वायूंचा पुनर्वापर करून त्याद्वारे बाष्पधारित जनित्रांतून (इंग्लिश: Steam Generator) अतिरिक्त वीजनिर्मिती केली जाते. अशा प्रकारे वापरल्या जाणाऱ्या एकंदरीत वायूच्या ८५% पर्यंतचे वस्तुमानाचे उष्मात आणि पर्यायाने विजेत रूपांतर केले जाते.

वाहतूक

[संपादन]

या प्रकल्पासाठी लागणारा नैसर्गिक वायूचे द्रवरूपात रूपांतर करून वायुक्षेत्रापासून वीजप्रकल्पापर्यंतची वाहतूक आणि हाताळणी सोईस्करपणे करता येते.

प्रकल्प

[संपादन]

महानिर्मिती (इंग्लिश: MahaGenco)चा उरण प्रकल्प, रत्‍नागिरी गॅस आणि पॉवरचा दाभोळ प्रकल्प असे मोठे वायूधारित वीजनिर्मिती प्रकल्प महाराष्ट्रात कार्यान्वित आहेत.

हे सुद्धा पहा

[संपादन]