Jump to content

वसंत नारायण नाईक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वसंतराव नारायणराव नाईक

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव
मतदारसंघ नाशिक

जन्म १९११
सिन्नर, जि. नाशिक
मृत्यू १४ डिसेंबर १९६८
भुसावळ
राजकीय पक्ष काँग्रेस
धर्म हिंदू, वंजारी

जन्म

[संपादन]

वसंतराव नाईक यांचा जन्म नांदगाव तालुक्यातील वेहेळगाव येथील श्रीमंत कुटुंबात १३ डिसेंबर १९१२ला झाला.

स्वातंत्र्यआंदोलनातील सहभाग

[संपादन]

स्वातंत्र्यप्राप्तीसाठी त्यांनी अनेक आंदोलनात सहभाग घेतला.सायमन कमिशनला विरोध करीत- म.गांधीजींच्या नेतृत्वाखाली मिठाच्या सत्याग्रहात भाग घेतला. प्रसंगी तुरुंगवास भोगला. भूमिगत राहून त्यांनी इंग्रजांना सळो कि पळो करून सोडले. मनमाड नगरपालिकेचे सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून राहण्याचा त्यांना बहुमान मिळाला. बिहार येथे झालेल्या भूकंपात डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी आपले स्वतंत्र पथक तयार करून भूकंपग्रस्तांना मदत केली.  १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनात भूमिगत राहून त्यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा पुकारला.[] सरकारकडून वसंतरावांना पकडण्यासाठी दहा हजाराचे बक्षीस जाहीर केले गेले. मात्र जनतेत विलक्षण लोकप्रिय असलेल्या वसंतरावांना या काळात अनेक कुटुंबांनी आश्रय देऊन पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळले. वसंतराव भूमिगत असतांना सरकारकडून त्यांच्या कुटुंबियांचा अतोनात छळ करण्यात आला. त्यांची मालमत्ता जप्तकेली गेली. मात्र वसंतरावांचे देशप्रेम व समर्पण यामुळे लिलावात कुणीही भाग घेतला नाही.

आईचे निधन

[संपादन]

याच काळात भूमिगत असतानाचा आईचे दुःखद निधन झाले. घराभोवती असलेला पोलीस पहारा चुकवीत स्रीच्या वेषात वसंतरावांनी आईचे अंत्यदर्शन घेतले.

निवडणुकीतील सहभाग

[संपादन]

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५२ साली झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणूकीत ते  विजयी झाले. पुढे  १९६२ व १९६७ असे दोन वेळेस ते  नाशिक मधून निवडणूक लढवून विजयी झाले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे ते तह्यात सदस्य होते.

मृत्यू

[संपादन]

१४ डिसेंबर १९६८ रोजी भुसावळ येथे वीज कामगारांच्या मेळाव्यात भाषण करीत असतांना ह्दय विकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे दुःखद निधन झाले. नाशिक मध्ये गोदाकाठी साश्रू नयनांनी त्यांच्यावर अपार प्रेम करणाऱ्या त्यांच्या जनतेने या लोकनायकास अखेरचा निरोप दिला.

चिरंतन स्मृती

[संपादन]

आपल्या लाडक्या नेत्याच्या वियोगाचे दुःख हलके करण्यासाठी व क्रांतिवीरांच्या कार्याची चिरंतन स्मृती राहावी हा उद्दात्त हेतू बाळगून नाशिक जिल्ह्यातील वंजारी समाजाच्या जेष्ठ धुरिणांनी त्यांच्या नावाने १९६९ मध्ये क्रांतिवीर वसंतराव  नारायणराव नाईक एज्युकेशन सोसायटी या संस्थेची स्थापना केली.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Krantiveer Vasantrao Naik" (इंग्रजी आणि मराठी भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)