वसंतराव आपटे (शेतकरी नेता)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

वसंतराव आपटे (जन्म : इ.स. १९३६; मृत्यू : १६ ऑगस्ट, इ.स. २०१७) हे शेतकरी संघटनेचे सोलापूरचे स्थानिक नेते होते. सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना तसेच सोलापूर जिल्हा दूध संघाचे ते संचालक होते. 

वसंतराव आपटे हे कॉलेज जीवनापासून एस.एम. जोशी यांच्या जनता दल चळवळीशी जोडले गेले. १९८१ साली शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेत त्यांनी स्वतःला वाहून घेऊन कामाला सुरुवात केली. समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनातही त्यांनी काम केले. अनवाणी शेतकरी श्रीमंत व्हावा यासाठी ते आयुष्यभर झटले.

शेतकऱ्यांचा लढा उभारताना दुसऱ्या बाजूला त्यांच्या वैयक्तिक अडीअडचणी जाणून घेऊन त्यांची सोडवणूक करणारा, शेतकरी कार्यकर्त्यांना मायेची सावली देणारा नेता अशी वसंतरावांची ओळख होती.

वसंतराव आपट्यांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त २९ ऑगस्ट २०१६ रोजी त्यांचा सोलापुरात नागरी सत्कार झाला होता. त्यांच्या निधनाने शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारा आधारवडच जणू पडला, अशी जनतेची भावना आहे.