वर्णद्वेष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अमेरिकेच्या मिसिसिपी राज्यातील एक चित्रपटगृहामधील आफ्रिकन अमेरिकन व्यक्तींसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार

वर्णद्वेष (इंग्लिश: Racism) ही समाजातील ठरावीक लोकांविरुद्ध भेदभाव करण्याची एक पद्धत आहे. वर्णद्वेषी विचारपद्धतीनुसार समाजामधील लोकांचे जात, वर्ण इत्यादी बाबींवरून वेगळे गट पाडले जातात. एक गटाला समाजात उच्च स्थान तर दुसऱ्या गटाला दुय्यम स्थान देण्यात येते. दक्षिण आफ्रिकेमधील वर्णभेद हे वर्णद्वेषाचे राजकीय स्तरावरील वापराचे उदाहरण आहे. नाझी जर्मनीद्वारे घडवण्यात आलेले होलोकॉस्ट देखील वर्णद्वेषाचेच उदाहरण आहे.