वर्ग चर्चा:अभिनेते
वर्ग - उपवर्ग वर्गीकरण
[संपादन]या वर्गामधे मला असं दिसून आलं की, इथे आपण भाषा - प्रांतवार उपवर्गही बनवले आहेत. तरीही काही अभिनेते थेट या वर्गामध्ये आहेत.
विकिपीडिया:प्रकल्प/वर्ग सुसूत्रीकरण अनुसार, आपण लेख जितके योग्य त्या उपवर्गात हलवू, तितकं चांगलं.
जर हे "अभिनेते" वर्गातले लेख आपण योग्य त्या उपवर्गात हलवले, तर ते जास्त संयुक्तिक ठरेल असं वाटतं. कृपया आपला अभिप्राय नोंदवा.
तसंच, हे हलवायचे झाले, तर एक-एक अभिनेता संपादित करुन हलवायचा की सर्व एका दमात करण्याची काही सोय उपलब्ध आहे, तेही सुचवावे.
धन्यवाद. Amodsv १४:५८, १ डिसेंबर २००९ (UTC)
- १. उपवर्ग - अभिनेते (किंवा इतरही लेख) योग्य त्या उपवर्गात असावेत पण त्याचबरोबर शक्य तितक्या उपवर्गांतूनही असावेत. उदा. रमेश देव हा लेख मराठी चित्रपट अभिनेते, हिंदी चित्रपट अभिनेते या दोन्ही वर्गांत बसेल. तसेच काही लेख उपवर्ग आणि वरील वर्ग दोन्हीत बसतील, तरी असे लेख दोन्हीत असावेत.
- २. लेख एक-एक करुन हलवता येतील किंवा एखादा सांगकाम्या (बॉट) वापरूनही हे करता येईल. मी पूर्वी AWB या सॉफ्टवेरमध्ये बदल करून बॉट चालवत असे (क्रिकाम्या, हरकाम्या, इ.)
- अभय नातू १५:१२, १ डिसेंबर २००९ (UTC)
- धन्यवाद. अर्थात, खरं पाहता, मुख्य वर्गामध्ये कोणताच अभिनेता थेट नको, तर योग्य त्या सर्व उपवर्गांत असायला हवा.
- विकिपीडिया:सांगकाम्या वापरण्याबाबत मी पूर्णपणे अनभिज्ञ आहे. त्याबाबत कुठे माहिती / मदतलेख मिळू शकेल का? Amodsv १५:२३, १ डिसेंबर २००९ (UTC)
वर्गीकरणाविषयी
[संपादन]इतर विकिपीडियांप्रमाणे मराठीत खालीलप्रमाणे वर्गीकरण असावे. वर्गः १ जन्मवर्ष २ भारतीय/परदेशातील ह्यात दोन उपगट अभिनेता/अभिनेत्री ३ प्रांत/वास्तव्य (राज्याचे/गावाचे नाव) ४ मातृभाषा (उदा.मराठी भाषक इ.) ५ अभिनय/दिग्दर्शन/निर्माता (कोण कोणत्या गटात मोडतो) ६ कार्यक्षेत्र भाषा १ (प्राथमिक आणि मुख्य कार्यक्षेत्र) ७ कार्यक्षेत्र भाषा २ (ज्यात कमी प्रमाणात काम केले आहे ) ८ पुरस्कार विजेता/विजेती (पुरस्कारांचे प्रकार उदा. हिंदी फिल्मफेअर,तमिळ फिल्मफेअर,आयफा,स्टारडस्ट इ.) ९ विशेष् (कार्याव्यतीरिक्त इतर काही योगदान असल्यास)
उदाहरण म्हणुन रजनीकांत चे इंग्रजीतील वर्गीकरण देत आहे. Categories: 1950 births | Indian film actors | Living people | Marathi people | People from Bangalore | Recipients of the Padma Bhushan | Tamil actors