वन वर्ल्ड ट्रेड सेंटर
Appearance
वन वर्ल्ड ट्रेड सेंटर | |
---|---|
सर्वसाधारण माहिती | |
प्रकार | कार्यालय |
ठिकाण |
मॅनहॅटन, न्यू यॉर्क 40°42′46.8″N 74°0′48.6″W / 40.713000°N 74.013500°W |
बांधकाम सुरुवात | २७ एप्रिल २००६ |
पूर्ण | ३ नोव्हेंबर २०१४ |
मूल्य | ३.९ अब्ज अमेरिकन डॉलर |
ऊंची | |
वास्तुशास्त्रीय | ५४१.३ मी (१,७७५.९ फूट) |
छत | ४१७ मी (१,३६८.१ फूट) |
वरचा मजला | ३८६.५ मी (१,२६८.० फूट) |
तांत्रिक माहिती | |
एकूण मजले | १०४ (+५ तळमजले) |
क्षेत्रफळ | ३,२५,२७९ चौ.मीटर |
प्रकाशमार्ग | ६१ |
बांधकाम | |
वास्तुविशारद | डेव्हिड चाईल्ड्स |
वन वर्ल्ड ट्रेड सेंटर (One World Trade Center) ही अमेरिकेच्याच्या न्यू यॉर्क शहरातील एक गगनचुंबी इमारत आहे. वर्ल्ड ट्रेड सेंटर संकुलाचा भाग असणारी ही इमारत सध्या पश्चिम गोलार्धामधील सर्वात उंच इमारत आहे. मूळ १ वर्ल्ड ट्रेड सेंटरची इमारत अल-कायदाने ११ सप्टेंबर २००१ रोजी केलेल्या विमानहल्यांमध्ये कोसळून नष्ट झाली होती.
१,७७६ फूट (५४१ मी) ही वन वर्ल्ड ट्रेड सेंटरची उंची इ.स. १७७६ साल निर्देशित करते जेव्हा अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा लिहिला गेला होता. ३० एप्रिल २०१२ रोजी ही इमारत एम्पायर स्टेट बिल्डिंगला मागे टाकून न्यू यॉर्कमधील सर्वात उंच इमारत बनली. ३ नोव्हेंबर २०१४ रोजी वन वर्ल्ड ट्रेड सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. सध्या वन वर्ल्ड ट्रेड सेंटर जगातील चौथ्या क्रमांकाची उंच इमारत आहे.
-
मूळ वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या जुळ्या इमारती
-
जून २०११ मधील दृष्य
-
३० एप्रिल २०१२ रोजीचे दृष्य
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |