बडोदा संस्थान
Appearance
(वडोदरा संस्थान या पानावरून पुनर्निर्देशित)
बडोदा संस्थान વડોદરા | ||||
|
||||
|
||||
राजधानी | बडोदा | |||
शासनप्रकार | राजतंत्र | |||
राष्ट्रप्रमुख | पहिला राजा: पिलाजीराव गायकवाड (१७२१-१७३२) अंतिम राजा: प्रतापसिंह गायकवाड (१९३९-१९४९) |
|||
अधिकृत भाषा | गुजराती, हिंदी, मराठी | |||
लोकसंख्या | २१२६५२२ | |||
–घनता | ६५६.५ प्रती चौरस किमी |
बडोदा संस्थान हे ब्रिटिश भारतातील मुंबई इलाख्यातील एक महत्त्वाचे संस्थान होते. या संस्थानाची राजधानी बडोदा ही होती. या संस्थानाची स्थापना १७२१ या वर्षी झाली.
संस्थानिक
[संपादन]बडोदा संस्थानाचे संस्थानिक गायकवाड घराणे होते. ते हिंदू ९६ कुळी मराठा समाजातील होते.
- पिलाजीराव गायकवाड (१७२१-१७३२)
- दमाजीराव गायकवाड (१७३२-१७६८)
- गोविंदराव गायकवाड (१७६८-१७७१)
- सयाजीराव गायकवाड प्रथम (१७७१-१७८९)
- मानाजीराव गायकवाड (१७८९-१७९३)
- गोविंदराव गायकवाड (पुनर्स्थापित १७९३-१८००)
- आनंदराव गायकवाड (१८००-१८१८)
- सयाजीराव गायकवाड द्वितीय (१८१८-१८४७)
- गणपतराव गायकवाड (१८४७-१८५६)
- खंडेराव गायकवाड (१८५६-१८७०)
- मल्हारराव गायकवाड (१८७०-१८७५)
- सयाजीराव गायकवाड तृतीय (१८७५-१९३९)
- प्रतापसिंह गायकवाड (१९३९-१९५१) - १९४७मध्ये राज्य भारतात विलीन
- फत्तेसिंहराव गायकवाड (१९५१-१९८८) - इ.स. १९६९पर्यंत नाममात्र राजे