वडाळा विठोबा मंदिर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पंढरपूर येथील विठोबा

वडाळा विठोबा मंदिर हे स्थान प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध आहे.महाराष्ट्र राज्यातील मुंबई शहरातील वडाळा या उपनगरात हे मंदिर आहे.[१]श्री विठोबा गणपती महादेव मंदिर असे या मंदिराचे नाव आहे.

इतिहास[संपादन]

४०० वर्षाचा जुना ईतिहास या मंदिराला आहे असे मानले जाते. मुंबई मधील आगरी आणि कोळी समजातील दिंडी वारीला जात असे. या वारीतील एका गुरुला पायाला दुखापत झाली असे वाटल्याने सर्वजण पाण्यात पाहू लागले त्यावेळी त्याना विठ्ठलाची मूर्ती सापडली. त्यावेळेपासून ही मूर्ती वडाळा येथे मंदिरात स्थापन करण्यता आली आहे.[२]स्थान महात्म्य[संपादन]

ज्या भविकांना दरवर्षी आषाढी एकादशीला श्री क्षेत्र पंढरपूर येथे जाणे शक्य होत नाही असे भाविक वडाळा येथील या मंदिरास दर्शनासाठी भेट देतात.आषाढी एकादशी च्या दिवशी या मंदिरात पांडुरंग आणि रुक्मिणी देवीची विशेष पूजा आयोजित केली जाते.[३]

वारी[संपादन]

मुंबई आणि परिसरातून वारकरी आपापल्याया दिंड्या घेऊन मंदिराला भेट देतात. आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दिवशी येथे विशेष जत्रा भरते.[४]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Greater Bombay District (इंग्रजी भाषेत). Gazetteers Department, Government of Maharashtra. 1986.
  2. ^ "'व' वडाळ्याचा आणि वरदाभाईचा". Maharashtra Times. 2022-07-09 रोजी पाहिले.
  3. ^ "मुंबई : प्रति पंढरपूर ओळख असणाऱ्या वडाळा येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये विनोद तावडे यांच्याकडून पूजा | 📰 LatestLY मराठी". LatestLY मराठी. 2019-07-12. 2022-07-09 रोजी पाहिले.
  4. ^ "यंदाच्या आषाढी एकादशीला 'प्रति पंढरपूर'चे होणार दर्शन ऑनलाईन..." eSakal - Marathi Newspaper. 2022-07-09 रोजी पाहिले.