Jump to content

लुक्रेझिया दे मेदिची

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लुक्रेझिया दे मेदिची (१४७०-१५५३) या पानावरून पुनर्निर्देशित)

लुक्रेझिया मरिया रोमोला दे मेदिची (४ ऑगस्ट, १४७० - नोव्हेंबर, १५५३) ही १५व्या शतकातील इटलीमधील फिरेंझेवर शासन करणाऱ्या मेदिची घराण्यातील स्त्री होती, ती लॉरेन्झो दे मेदिची आणि क्लॅरिचे ओर्सिनी [] यांची थोरली मुलगी आणि मारिया साल्वियाती आणि जियोव्हानी साल्वियाती यांची आई होती. []

लुक्रेझियाचे लग्न फेब्रुवारी १४८८ मध्ये याकोपो साल्व्हियातीशी झाले. [] तिच्या लग्नात २,००० फ्लोरिन्सचा हुंडा दिला गेला होता. [] जेव्हा तिच्या भावांना फिरेंझेमधून हद्दपार करण्यात आले तेव्हा ती कठीण परिस्थितीत आली कारण याकोपो नवीन राज्यकर्त्यांचा समर्थक होता. [] ऑगस्ट १४९७मध्ये तिने तिचा भाऊ पिएरोला सत्तेवर परत आणण्या साठी ३,००० डकट्स खर्च केले. [] जेव्हा हा कट अयशस्वी झाला तेव्हा त्यात सहभागी झालेल्या पुरुषांना मृत्युदंड देण्यात आली, परंतु फिरेंझेच्या नेता फ्रांचेस्को व्हॅलोरीने लुक्रेझियाला स्त्री असल्यामुळे सोडून दिले. []

मार्च १५१३ मध्ये तिचा एक भाऊ पोप लिओ दहावा झाला. [] १५१४मध्ये व्हॅटिकनचा खजिना रिकामा होत आल्यामुळे त्याने आपला मुकुट लुक्रेझिया आणि तिच्या पतीकडे ४४,००० डुकाट रकमेसाठी गहाण ठेवला होता.[]

१५३३ मध्ये याकोपोचा मृत्यू झाल्यानंतर वीस वर्षांनी वयाच्या ८३व्या वर्षी लुक्रेझियाचा मृत्यू झाला.

अपत्ये

[संपादन]

लुक्रेझिया आणि याकोपो साल्व्हियातींना अकरा मुले (सहा मुलगे आणि पाच मुली) झाल्या.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Tomas 2003, पान. 7.
  2. ^ Tomas 2003, पान. 5.
  3. ^ Tomas 2003, पान. 21.
  4. ^ Tomas 2003, पान. 20.
  5. ^ a b c Tomas 2003, पान. 109.
  6. ^ Tomas 2003, पान. 126.
  7. ^ Tomas 2003, पान. 130.