लिंगभेद
Appearance
लिंगभेद हे एखाद्या व्यक्तीचा लिंग किंवा लिंगावर आधारित पूर्वाग्रहवरून भेदभाव करणे होय. लिंगभेद कोणासही प्रभावित करू शकतो, परंतु प्रामुख्याने महिला आणि मुलींवर याचा परिणाम होतो. हे रूढीबद्धता आणि लिंग भूमिकांशी जोडलेले आहे आणि असे मानले जाऊ शकते की एक लिंग दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. अत्यंत कडवा लिंगभेद लैंगिक शोषण, बलात्कार आणि लैंगिक हिंसा सारख्या प्रकारांना प्रोत्साहन देऊ शकतो. लिंगभेद विशेषतः कामाच्या ठिकाणी असमानतेच्या बाबतीत परिभाषित करण्यासाठी वापरला जातो.