लास्को

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लॅस्को गुहेत चित्रित एक घोड्याचे चित्र

लॅस्को हे फ्रान्समधील प्रागैतिहासिक गुहाचित्रे असलेले स्थळ आहे. दोर्गोन्य विभागातील माँतीनॅक गावाजवळ व्हेझर नदीच्या खोऱ्यात ते वसलेले आहे. इ.स. १९७९ साली युनेस्कोने या स्थळाचा जागतिक वारसा स्थान म्हणून आपल्या यादीत समावेश केलेला आहे.[१]

शोध[संपादन]

१२ सप्टेंबर, इ.स. १९४० या दिवशी माल्कल रावीडट, जॅक मार्सल, जॉर्ज अँजल, सायमन कॉइनकस या छोट्या मुलांनी तसेच छोटे कुत्र्याचे पिलू रोबोट यांनी लॅस्को येथील गुहाचित्रांचा शोध लावला. मार्कलच्या कुत्र्याच्या पिलाबरोबर ही मुले खेळत असताना हे कुत्र्याचे पिलू एका गुहा बिळात शिरले. त्याच्या पाठोपाठ गेलेल्या या मुलांना ही गुहेतील भित्तीचित्रे आढळली.[२]

भित्तिचित्रे[संपादन]

लॅस्को येथील गुहात चितारलेली भित्तिचित्रे ही फिकट रंगाच्या पार्श्वभूमीवर काढलेली आहेत. रंगीत चित्रांव्यतिरीक्त येथे उत्कीर्ण चित्रांचीही रेखांकने आहेत. हरीण, सिंह, बारशिंगा, रानगवा आणि प्रचंड हत्ती यांची चित्रे येथे असून ही सर्व चित्रे एकाच परिमाणात काढलेली आहेत. काळवीट, बैल, घोडे या प्राण्यांची चित्रे वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

कालमापन[संपादन]

लॅस्को येथील चित्रे युरोपातील उत्त्तराश्मयुगीन म्हणजे ऑरिग्नेशियन (पेरीगोर्डियन) काळातील असून चित्रशैली, जनावरांची जातकुळी आणि कार्बन १४ किरणोत्सर्ग कालमापन पद्धती नुसार येथील गुहाचित्रे ही १७,३०० वर्षांपूर्वीची आहेत.[३][४]

इतर माहिती[संपादन]

लॅस्को येथील गुहांचा शोध लागला त्यावेळी येथील चित्रे सुस्थितीत होती त्यामुळे इ.स. १९४८ साली ती प्रेक्षकांसाठी खुली करण्यात आली.[५] परंतु रोजच्या जवळपास १२०० प्रेक्षकांच्या भेटीमुळे निर्माण होणाऱ्या कार्बन डायॉक्साईडमुळे व काही इतर कारणांनी या चित्रांतील काही रंग फिकट होऊ लागले व काही चित्रांवर हिरवी बुरशी चढू लागली त्यामुळे इ.स. १९६३ पासून ही गुहाचित्रे प्रेक्षकांना पाहण्यासाठी बंद करण्यात आली. या चित्रांचे परत संवर्धन केल्यानंतर इ.स. १९८३ साली या चित्रांच्या मूळ ठिकाणापासून २०० मीटर अंतरावरून प्रेक्षकांना पाहण्यासाठी ती परत खुली करण्यात आली.[२]

चित्रदालन[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. प्रीहिस्टोरीक साईटअ्स ॲन्ड डेकोरेटेड केव्ह्ज ऑफ द व्हेझर व्हॅली. युनेस्को वर्ल्ड हेरीटेज सेंटर. ३० मे, २०१२ रोजी पाहिले. (इंग्रजी मजकूर)
  2. २.० २.१ बॅन, पॉल जी. (२००७). केव्ह आर्ट : अ गाइ्ड टू द डेकोरेटेड आइस एज केव्ह्ज ऑफ युरोप. फ्रान्सेस लिंकोलिन, पृ. ८१–८५. आय.एस.बी.एन. ०-७११२-२६५५-५. ३० मे, २०१२ रोजी मिळवले. (इंग्रजी मजकूर) 
  3. कॅपेलो, होली (जुलै २०१०). सिम्बॉल्स फ्रॉम द स्काय: हेवन्ली मेसेजेस फ्रॉम द डेप्थ्स ऑफ प्रीहिस्ट्री मे बी एनकोडेड ऑन द वॉल्स ऑफ केव्ह्स थ्रूआऊट युरोप.. सीड मॅगेझिन. ३० मे, २०१२ रोजी पाहिले. (इंग्रजी मजकूर)
  4. व्हॉट द लॅस्को केव्ह पेंटींग टेल अस अबाऊट हाऊ अवर अँकेस्टर्स अंडरस्टूड द स्टार्स (२००९). ३० मे, २०१२ रोजी पाहिले. (इंग्रजी मजकूर)
  5. लिटलवूड, इआन (२००२, २००५). अ टाईमलाइन हिस्ट्री ऑफ फ्रान्स. बार्नेस ॲन्ड नोबेल, पृ. २९६. आय.एस.बी.एन. ०-७६०७-७९७५-९. ३० मे, २०१२ रोजी मिळवले. (इंग्रजी मजकूर) 

बाह्य दुवे[संपादन]

गुणक: 45°02′57″N 1°10′34″E / 45.04917°N 1.17611°E / 45.04917; 1.17611