चर्चा:लास्को
Appearance
लास्को असा उच्चार
[संपादन]फ्रेंच भाषेच्या उच्चारपद्धतींनुसार "au" या वर्णसमूहाचा उच्चार "ओ" असा होतो. शेवटचा "x" अनुच्चारित राहतो. फ्रेंच भाषेत "a"चा उच्चार बहुशः "आ" असा करतात. त्यामुळे Lascaux या नावाचे देवनागरी मराठीत लेखन "लास्को" असे होईल.
खेरीज फॉर्वो.कॉम या संकेतस्थळावरील या नावाच्या फ्रेंच माणसाने केलेल्या नमुना उच्चारानुसार "लास्को" हे नाव योग्य ठरते.
तूर्तास वरील बाबी लक्षात घेऊन मी या लेखाचे "लास्को" शीर्षकाकडे स्थानांतर करून ठेवत आहे. अन्य काही सुधारणा/बारीकसारीक दुरुस्त्या असल्यास, त्या मागाहून करता येतीलच.
--संकल्प द्रविड (Sankalp Dravid) (चर्चा | योगदान) १४:१४, २ जून २०१२ (IST)