लांघणज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

लांघणज हे गुजरात राज्यातील महेसाणा जिल्ह्यातील एक पुरातत्त्वीय स्थळ आहे. इ.स. १९४१ ते इ.स. १९६३ या कालावधीत याठीकाणी केल्या गेलेल्या उत्खननात आंतर अश्मयुगीन संस्कृतीचे अवशेष आढळले. त्यात मानवी सांगाडे,गारगोटीची लहान हत्यारे,मृदभांडी सापडली. मृतांचे एकूण तेरा सांगाडे उत्खननातून मिळाले. हे सांगाडे हातपाय दुमडून उत्तर-दक्षिण अशा स्थितीत पुरलेले मिळाले.[१] लांघणजला सापडलेल्या आंतराश्मयुगीन संस्कृतीच्या तारखा कार्बन १४ पध्दतीनुसार इ.स.पू. २५८५ ते २१५० अशा आलेल्या आहेत.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ शांताराम भालचंद्र देव. "लांघणज". २१ ऑगस्ट, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.