पाषाण युग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पाषाणयुग हा प्रागैतिहासिक प्रबोधनाआधीचा काळ आहे. या काळात माणसाला दगडाचे उपयोग समजू लागले. लाकूड, हाडे व इतर तत्सम वस्तूंचा वापर होत असे, पण मुख्यतः दगडाचा वापर कापण्याची हत्यारे बनवण्यासाठी केला जात असे.

या काळाची सुरुवात अंदाजे २७ लक्ष वर्षांपूर्वी झाली. माणसाच्या काही जमाती विसाव्या शतकापर्यंत देखील पाषाणयुगाप्रमाणेच जगत होत्या. ते दगडाचा वापर प्राण्यांना मारण्यासाठी व त्यांपासून अन्न आणि वस्त्रे मिळवण्यासाठी करत असत.

पाषाणयुगाच्या पुढील काळाला ताम्रयुग असे म्हणतात. तांबे अथवा कांस्य धातूंपासून या युगाचे नाव पडले. ज्या वेळी माणसाला धातू बनवण्याचा शोध लागला, तेव्हा पाषाणयुगाचा अस्त झाला. सर्वप्रथम तांबे या धातूचा शोध लागला व त्यानंतर कांस्य धातूचा शोध लागला. लोकांनी मध्य-पूर्व भागांत अंदाजे ख्रि.पू. ३००० ते २००० काळात फक्त दगडाचा वापर सोडून देऊन तांबे वापरण्यास सुरुवात केली.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.