Jump to content

ललित राय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ललित राय (२४ जानेवारी, इ.स. १९५६[] - ) हे भारतीय सैन्यातील भूतपूर्व अधिकारी आहेत.

शिक्षण पूर्ण केल्यावर ते ७/११ गुर्खा रायफल्स या तुकडीमध्ये दाखल झाली. त्यांचे वडील याच तुकडीमध्ये कार्यरत होते.[]

परंतु ते कारगिल मध्ये ज्या तुकडीतून गेले ती १/११ तुकडी, 'विजय मोहीम' होती. ते त्यांच्या अनुभव कथनात सांगतात: मला सर्व प्रकारच्या प्रदेशांत नेमले गेले होते. डोंगर, दऱ्या, बर्फ, वाळवंट, रान, अतिशय उंचीवरील प्रदेश इ. सारखे अनेक! कालांतराने एकदा त्यांनी १७, राष्ट्रीय रायफल्स यांचे नेतृत्वही केले होते.

'विजय' मोहीम

[संपादन]

विजय मोहीम कारगिल मध्ये झाली. मे २००१ मधील पहिल्या आठवड्याच्या आसपास आसपासचा काळ होता. खरी चकमक सुरू होईपर्यंत मे-अंत उजाडला होता. १/११ गुरखा रायफल्स विजय मोहिमेत आघाडीवर होतं. त्यावेळी राय यांचे 'कर्नल ऑफ द रेजिमेंट' यांनी त्यांच्याशी संवाद साधला: "पूर्वीचे तुकडीप्रमुख राजीनामा देत आहेत. परंतु युद्ध आता खोल स्थितीत शिरलं आहे. तू ह्याचा ताबा घेशील का?" ललित राय यांनी त्वरित होकार दिला. ललित राय राष्ट्रीय रायफल्सच्या सूत्रांवरून नुकतेच परत आले होते. त्यामुळे गुरखा रायफल्सचे सैनिक, पद्धती व भूप्रदेश- सर्व काही नवीन होते.त्या परिस्थितीत शत्रू शत्रूबद्दलची माहितीही पुरेशी नव्हती. पण तरीही कामगिरी हाती घेण्याचा निश्चय रायनी हाती घेतला होता. फत्ते करून दाखवण्याच्या ध्येयानेच. ललित राय यांना हेलीकॉप्टरच्या सहाय्याने ४८ तासांच्या आत युद्धभूमीवर नेण्यात आले. त्यावेळी शत्रूने त्यांच्यावर बेदम गोळीबार केला. गुरखा रायफल्स सैनिक सैरावैरा पळू लागले. अशा वेळी त्यांना गरज होती चांगल्या नेत्तृत्त्वाची. [] बटालियनला 'खालुबार' शिखरावर ताबा मिळवण्यास सांगितले होते. समुद्रसपाटीपासून १७५०० फुटांवर असलेलं शिखर.[](खलुबारचे स्थळ: ३४.५४१४९, ७६.०३४८०३) []

War Memorial: Operation Vijay

तसेच खालुबार शिखर हे शत्रूच्या इलाक्यात खूपच खोलवर होते. एकीकडे पाकिस्तानी सैनिक शस्त्र घेऊन सुसज्ज होतेच.

संदर्भ
[संपादन]
  1. ^ ललित राय यांचा जन्म
  2. ^ ७/११ गुर्खा रायफल्स
  3. ^ 'विजय' मोहीम
  4. ^ "Khalubaar Top". 2012-11-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-01-26 रोजी पाहिले.
  5. ^ खलुबार शिखर