ललित कलादर्श

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.

संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी १ जानेवारी १९०८ रोजी ’ललितकलादर्श संगीत नाटक मंडळी’ची स्थापना केली. नंतर ही संस्था बापूराव पेंढारकर आणि पुढे भालचंद्र पेंढारकरयांनी चालू ठेवली. ’ललितकलादर्श’ने भा.वि. वरेरकरांची अनेक नाटके रंगभूमीवर सादर केली. रंगभूमीवरील नेपथ्याच्या संदर्भातील काही महत्त्वाचे प्रयोग ’ललितकलादर्श’ला वरेरकरांच्या नाटकाच्या लेखनामुळे करावे लागले. उदाहरणार्थ ’सत्तेचे गुलाम’ या नाटकापासून मराठी रंगभूमीवर नेपथ्य म्हणून फ्लॅट सीन यायला लागले. या आधी गुंडाळी पडद्यावर नाटके होत असत. या पडद्यामुळे रस्ता, महाल, देऊळ राजवाडा, घर यांची हुबेहूबता आणण्याचा कितीही प्रयत्‍न केला तरी तो रंगवलेला पडदा आहे ही वस्तुस्थिती नाकारता येत नव्हती. ’ललितकलादर्श या संस्थेने प्रथम फ्लॅट सीनचा उपयोग सुरू केला.

’ललित कलादर्श’ने रंगमंचावर सादर केलेली नाटके[संपादन]

 • आकाशगंगा
 • आनंदी-गोपाळ
 • करग्रहण
 • कुंजविहारी
 • कृष्णार्जुन युद्ध
 • गीत सौभद्र
 • गीता गाती ज्ञानेश्वर
 • गोकुळचा चोर
 • गोपीचंद
 • जय जय गौरी शंकर
 • झाला अनंत हनुमंत
 • तू वेडा कुंभार
 • दुरितांचे तिमिर जावो
 • तुरुंगाच्या दारात
 • दामिनी
 • द्यूत विनोद
 • पडछाया
 • पंडितराज जग्न्‍नाथ
 • पुण्यप्रभाव
 • बहुरूपी हा खेळ असा
 • बावनखणी
 • मंदारमाला
 • मदालसा
 • मानापमान
 • मुद्रिका
 • मूकनायक
 • तक्त नको मज प्रेम हवे
 • रंगात रंगला श्रीरंग
 • राक्षसी महत्त्वाकांक्षा
 • वधूपरीक्षा
 • व्रतपालन
 • शहाशिवाजी
 • शारदा
 • शिक्काकट्यार
 • श्री
 • सज्जन
 • सत्तेचे गुलाम
 • संन्याशाचा संसार
 • संयुक्त मानापमान
 • सोन्याचा कळस
 • स्वामिनी
 • हाच मुलाचा बाप