Jump to content

बापूराव पेंढारकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


व्यंकटेश बळवंत पेंढारकर ऊर्फ बापूराव पेंढारकर (१० डिसेंबर, इ.स. १८९२ - १५ मार्च, इ.स. १९३७; ग्वाल्हेर, ग्वाल्हेर संस्थान) हे मराठी रंगभूमीवर स्त्रीभूमिका करणारे प्रसिद्ध नट, गायक आणि वादक होते. बापूराव हे केशवराव भोसले ह्यांनी स्थापन केलेल्या ललित कलादर्श ह्या नाट्यसंस्थेचे अध्वर्यू होते.[१].

केशवराव भोसले यांनी स्थापन केलेल्या ललित कलादर्श या नाट्यसंस्थेचे कार्य बापूराव पेंढारकर आणि त्याच्या नंतर भालचंद्र पेंढारकर यांनी पुढे चालू ठेवले. त्यांना या कामात अनेक वेळा आर्थिक समस्यांनी ग्रासले, पण त्यांनी ललित कलादर्शचे काम तडफेने पुढे चालूच ठेवले.

बापूराव पेंढारकरांनी रंगभूमीवर आणलेली नाटके[संपादन]

  • तुरुंगाच्या दारात
  • शहाशिवाजी
  • संगीत श्री
  • सत्तेचे गुलाम
  • हाच मुलाचा बाप, वगैरे

संदर्भ[संपादन]

  1. ^ "बापूराव पेंढारकरांबद्दल माहिती". Archived from the original on 2009-03-28. १४ ऑक्टोबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)