र्हाइनलांड
Jump to navigation
Jump to search

ऱ्हाईन नदी भोवतालचा ऱ्हाइनलांड
ऱ्हाइनलँड हा युरोपामधील ऱ्हाईन नदीच्या भोवतालचा एक भौगोलिक प्रदेश आहे. सध्या हा जवळजवळ सर्व प्रदेश जर्मनी देशाच्या अधिपत्याखाली आहे. र्हाइनलांड-फाल्त्स व नोर्डर्हाईन-वेस्टफालन ही जर्मनीची २ राज्ये र्हाइनलँड हा शब्द आपल्या नावात वापरतात.
आखन, बॉन, ड्युसेलडॉर्फ, लेफेरकुसन, क्योल्न इत्यादी मोठी जर्मन शहरे र्हाइनलँड परिसरात वसलेली आहेत.