रॉबर्ट ब्राउनिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रॉबर्ट ब्राउनिंग
Robert Browning later years.jpg
उतारवयातील रॉबर्ट ब्राउनिंग
जन्म ७ मे १८१२ (1812-05-07)
कॅम्बरवेल, इंग्लंड
मृत्यू १२ डिसेंबर, १८८९ (वय ७७)
व्हेनिस, इटली
साहित्य प्रकार काव्य
प्रसिद्ध साहित्यकृती ‘पाऊलाइन - अ फ्रॅगमेंट ऑफ अ कन्फेशन’
‘सोर्डेलो’
‘बेल्स अँड पोमेग्रॅनाटस’
‘मेन अँड वुमेन’
‘द इन अल्बम’
स्वाक्षरी रॉबर्ट ब्राउनिंग ह्यांची स्वाक्षरी

रॉबर्ट ब्राउनिंग (७ मे, इ.स. १८१२ - १२ डिसेंबर, इ.स. १८८९) हा इंग्लिश कवी होता. त्याचा जन्म इंग्लंडमध्ये थेम्स नदीच्या दक्षिणेला असलेल्या कॅम्बरवेल या गावी झाला. त्याचे आई-वडील हे पुराणमतवादी होते. ब्राउनिंग कुटुंब मध्यमवर्गीय होते. ब्राउनिंगचे बहुतेक शिक्षण घरीच झाले. त्याला चित्रकलासंगीत या विषयांमध्येही रस होता.

वैवाहिक जीवन[संपादन]

एलिझाबेथ बॅरेट या कवयित्रीवर रॉबर्ट ब्राउनिंगने उत्कट प्रेम केले. वयाच्या २७व्या वर्षी बॅरेटच्या कविता वाचून ब्राउनिंगने तिला पत्र लिहिले[१] पण बॅरेट असाध्य रोगाने आजारी होती. त्यामुळे तिचे वडील तिला कुणालाही भेटू देत नसत. त्यामुळे रॉबर्ट-बॅरेट पत्रांद्वारे एकमेकांना भेटत. त्यातून त्यांचे प्रेम वाढत गेले. सरतेशेवटी सर्व अडथळ्यांवर मात करून, पळून जाऊन त्यांनी लग्न केले आणि इटलीत हे कविदांपत्य स्थायिक झाले. विवाहानंतर एलिझाबेथ व रॉबर्ट यांना एक मुलगाही झाला. परंतु सुखाचे हे दिवस फार काळ टिकले नाहीत. एलिझाबेथचा आजार पुन्हा बळावला आणि त्यातच तिचे इ.स. १८६१ साली निधन झाले. ब्राउनिंगच्या मेन अँड वुमेन या काव्यसंग्रहात त्याच्या इटलीत वास्तव्याला असतानाच्या प्रेमकविता आहेत.

पत्नीच्या निधनानंतर रॉबर्ट मुलासह इंग्लंडला परत आला. त्यानंतर त्याने त्याची द रिंग अँड द बुक ही प्रसिद्ध शोकात्म प्रेमकविता लिहिली. ही कविता नंतर चार खंडांत प्रकाशित झाली.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Robert Browning" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2013-11-29. १ सप्टेंबर, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)