रॉकी बाल्बोआ
fictional character in the Rocky film series | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | एप्रिल ६, इ.स. १९४६ फिलाडेल्फिया Robert Balboa | ||
---|---|---|---|
नागरिकत्व | |||
व्यवसाय |
| ||
अपत्य |
| ||
वैवाहिक जोडीदार |
| ||
येथे उल्लेख आहे |
| ||
| |||
रॉबर्ट "रॉकी" बाल्बोआ (त्याच्या मैदानातील द इटालियन स्टॅलियन या नावाने देखील ओळखला जातो) हे एक काल्पनिक शीर्षक पात्र आणि रॉकी चित्रपट मालिकेचा नायक आहे. हे पात्र सिल्वेस्टर स्टॅलोन याने तयार केले होते, आणि त्यानेच चित्रपट मालिकेतील आठही चित्रपटांमध्ये ही भूमिका साकारली आहे. त्याला फिलाडेल्फियाच्या झोपडपट्ट्यांमधील कामगार वर्ग किंवा गरीब इटालियन-अमेरिकन म्हणून चित्रित केले गेले आहे. रॉकीने स्थानिक माफिया लोन शार्कसाठी क्लब फायटर कामास सुरुवात केली. एक व्यावसायिक बॉक्सर म्हणून त्याच्या आयुष्यात आणि कारकिर्दीत आलेल्या अडथळ्यांवर मात करत असल्याचे चित्रण दाखवले आहे.
या मालिकेच्या पहिल्या चित्रपटाची कथा मुहम्मद अलीशी लढलेल्या आणि १५व्या फेरीत TKO वर पराभूत झालेल्या बॉक्सर चक वेपनर याच्यापासून प्रेरित आहे. चित्रपटाचे नाव, प्रतिमा आणि लढाऊ शैलीची प्रेरणा बॉक्सिंगमधील दिग्गज रोको फ्रान्सिस "रॉकी मार्सियानो" कडून घेतली आहे.
ही व्यक्तिरेखा स्टॅलोनची सर्वात प्रतिष्ठित भूमिका मानली जाते. या भूमिकेतून त्याच्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात झाल्याचे मानले जाते. या भूमिकेने अकादमी पुरस्कार आणि गोल्डन ग्लोब पुरस्कार नामांकने दिली, तसेच पहिल्या चित्रपटातील त्याच्या अभिनयासाठी समीक्षकांनी खूप प्रशंसा केली. जेव्हा स्टॅलोनने २०१५ मध्ये क्रीडसाठी पुन्हा एकदा या भूमिकेची पुनरावृत्ती केली, तेव्हा त्याच्या कामगिरीला सार्वत्रिक प्रशंसा मिळाली आणि त्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठीचा पहिला गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला. तसेच त्याच्या सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून तिसरे ऑस्कर नामांकन, राष्ट्रीय पुनरावलोकन मंडळाचा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कार आणि इतर अनेक पुरस्कार प्राप्त झाले.