रितेश अग्रवाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रितेश अग्रवाल हे ओयो रूम्सचे मालक व संस्थापक आहेत. ओयो रूम्सचा मुख्य उद्देश कमी किमतीमध्ये देशातील मोठ्या हॉटेल्समध्ये रूम उपलब्ध करून देणे हा आहे. २०१३ मध्ये वयाचा २० व्या वर्षी त्यांनी ओयो रूम्स ॲपची सुरुवात केली.

सुरुवातीचे जीवन[संपादन]

रितेश अग्रवाल यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९९३ मध्ये ओरिसा राज्यातील कटक या ठिकाणी झाला. तेथॆच प्राथमिक शिक्षणा घेतल्यावर ते अधिक शिक्षणासाठी राजस्थान मधील कोटा येथे गेले. रितेश यांना नवनवीन ठिकाणी फिरण्याचा छंद होता. त्यामुळे ते खूप ठिकाणी फिरले. जेव्हा ते प्रवासासाठी जात असत तेव्हा त्यांना राहण्यासाठी रूम मिळत नसत, किंवा जास्त पैसे देऊन सुद्धा चांगली रूम मिळत नव्हती. तर कधी कधी कमी पैसे देऊन चांगली रूम मिळत असे. ह्या सगळ्या अनुभवांमधून प्रेरणा घेऊन त्यांनी ठरवले की ऑनलाईन रूम बुक करण्याची एक वेबसाईट सुरू करायची, की ज्यामुळे प्रवाशांना चांगल्या सोयी सुविधा मिळतील.

ओयो रूम्सची सुरुवात[संपादन]

२०१२ मध्ये त्यांनी आपल्या ओरॅव्हल स्टेज़ (Oravel Stays) नावाच्या कंपनीची सुरुवात केली. काहीच महिन्याने नवीन चालू झालेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्हेंचर नर्सरी या कंपनीकडून त्यांना ३० लाखांचा फंड मिळाला. खूप कमी वेळामध्ये त्यांचा कंपनीला जे यश मिळाले त्यामुळे ते खूप उत्साहित झाले व ते अजून उत्साहाने व बारकाईने काम करू लागले. पण त्यांचा ह्या कंपनीचे मॉडेल अयशस्वी ठरले व त्यांची कंपनी तोट्यात गेली. त्यांनी कंपनीची परिस्थिती सुधरवण्याचा खूप प्रयत्न केला पण ती सुधारू शकली नाही व त्यांनी ओरॅव्हल स्टेज़ कंपनी तात्पुरती बंद केली.

नव्याने सुरुवात[संपादन]

रितेश अग्रवाल यांची कंपनी जरी बंद केली तरी त्यांनी हर मानली नव्हती, त्यांची पुन्हा नव्याने सुरुवात करण्याचे ठरवले. त्यांना प्रवास करताना ज्या अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यावर त्यांनी विचार केला. २०१३ साली त्यांनी नवीन कंपनीची सुरुवात केली. तीचे नाव त्यांनी ओयो रूम्स असे ठेवले. ओयो रूम्सचा अर्थ असा होतो कि, तुमची स्वतःची रूम. ओयो रूम्स चा उद्धेश फक्त लोकांना रूम उपलब्ध करून देणे इतकाच नव्हता, तर लोकांना कमी किमतीमध्ये चांगल्या रूम्स उपलब्ध करून देणे हा होता. त्यांची कंपनी हॉटेल्स मध्ये जाऊन रूमची पडताळणी करते. रूमची पडताळणी करून मग जर ते हॉटेल पसंद पडले तरच ते ओयो शी जोडले जात असे.

आता १५००० पेक्षा जास्त हॉटेल्स ओयो रूम्स मध्ये समाविष्ट आहेत. २०१६ मध्ये जपानच्या एका कंपनीने रितेश अग्रवाल यांचा कंपनी मध्ये अब्जावधी रुपयांची गुंतवणूक केली. २०१६ मधेच एका प्रतिष्ठित मॅगाझीन ने रितेश अग्रवाल यांना भारतीय प्रभावशाली युवकांचा यादीमध्ये पहिल्या ५० लोकांचा यादी मध्ये स्थान दिले होते.

संदर्भ[संपादन]

https://www.onlyhindihelp.com/2019/02/ritesh-agarwal-Success-Story-hindi.html

https://hindime.net/ritesh-agarwal-success-story/

https://happyhindi.com/startup-youth-story-ritesh-agarwal-oyo-rooms/

https://aajtak.intoday.in/education/story/oyo-rooms-owner-ritesh-agarwal-success-story-1-913249.html

http://www.spotyourstory.com/ritesh-agarwal-oyo-rooms-story/

https://www.youtube.com/watch?v=y1kEG6y2S1M

https://tipgeeks.com

https://moneytricks360.com/