रा.श्री. मोरवंचीकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रा. डॉ. रामचंद्र श्रीनिवास मोरवंचीकर (६ डिसेंबर, १९३७:चिंचोली, सोलापूर जिल्हा, महाराष्ट्र]] - ) हे पुरातत्त्व विषयाचे अभ्यासक व लेखक आहेत. त्यांनी जगभरातील लोकसंस्कृतीचा पाण्याचा अंगाने अभ्यास करून एकूण ५२ पुस्तके लिहिली.

ते ४० वर्षे इतिहासाचे प्राध्यापक होते. महाराष्ट्र टाइम्सच्या ‘सगुण-निर्गुण’ सदरात ते ज्ञानेश्वरीवर लिहीत

मोरवंचीकरांनी तेर (तगर), पैठण (प्रतिष्ठान) येथे वास्तव्य केले आणि पुढे औरंगाबाद येथे. ज्या ज्या स्थानी जाऊ त्या स्थानाचा भूगोल आणि सांस्कृतिक वैशिष्ट्य शोधणे हा त्यांचा ध्यास असतो.

मोरवंचीकर यांनी पाणी हा इतिहासाचा केंद्रबिंदू मानून महाराष्ट्रातील, विशेषतः मराठवाड्यातील लोकसंस्कृती कशी विकसित होत गेली याचा अभ्यास केला.

मोरवंचीकरांनी जलसंस्कृतीची मांडणी करताना अश्मक-मूलक, पेतनिक, मौर्यसत्ता आणि सातवाहन या राजसत्तांचा अभ्यास केला. त्यांनी यांनी पैठणमध्ये उत्खनन केले. मलिक अंबरने राजाच्या सुरक्षेसाठी म्हणून पाणवठाच किल्ल्यामध्ये कसा आणला हे त्यांनी दाखवून दिले.

पाण्याच्या संरक्षणासाठी आणि व्यवस्थापनेसाठी जनजागृती व्हायला हवी, यासाठी डा. रा.श्री. मोरवंचीकरांनी भारतीय जलसंस्कृती मंडळ सुरू केले

निवडक पुस्तके[संपादन]

 • Indian Waterculture (इंग्रजी)
 • इतिहास : आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण - शिल्पकार चरित्रकोश (अनेक खंड)
 • जैनांचे सांस्कृतिक योगदान
 • दक्षिण काशी पैठण
 • देवगिरी-दौलताबाद ॲन आर्किऑलॉजिकल व्ह्यू (इंग्रजी)
 • भारतीय जलसंस्कृती : स्वरूप आणि व्याप्ती
 • पाणीटंचाईवर उपाय अमृतधारा
 • पैठणी - तंत्र व वैभव
 • पैठण : थ्रू द एजेस्
 • प्रतिष्ठान ते पैठण
 • भीष्महृदय (ललित साहित्यकृती)
 • मध्ययुगीन जलसंधारण - जलव्यवस्थापन (देवगिरी-दौलताबाद) (मूळ इंग्रजी, मराठी अनुवाद : प्रदीप भलगे)
 • युगानुयुगे चांदवड
 • येई परतुनी ज्ञानेश्वरा
 • वुडवर्क ऑफ वेस्टर्न इंडिया (इंग्रजी)
 • शुष्क नद्यांचा आक्रोश
 • सातवाहनकालीन महाराष्ट्र
 • प्राचीन भारत

सन्मान आणि पुरस्कार[संपादन]

 • मराठवाडा विद्यापीठाचा 'जीवनसाधना' हा सन्मान