रामनाथ चव्हाण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


रामनाथ चव्हाण मराठी लेखक आहेत. दलित साहित्य आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील महत्त्वाचे लेखक म्हणून यांचा उल्लेख केला जातो. त्यांनी कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका, व्यक्तिचित्रे, भटक्या-विमुक्तांच्या संदर्भातले संशोधनात्मक लेखन असे विविध साहित्य प्रकार हाताळलेले आहेत. ते पुणे विद्यापीठात अण्णाभाऊ साठे अध्यासनाचे प्रमुख होतेे.रामनाथ चव्हाण यांचा दलित साहित्य आणि सामाजिक परिवर्तनाच्या संदर्भात संशोधनपर लिखाण करून नाटक, कादंबरी, कथा, एकांकिका आणि व्यक्तिचित्रे या साहित्यप्रकारांत त्यांनी मौलिक योगदान दिले आहे. 'भटक्या-विमुक्तांची जातपंचायत' हे पाच खंडात प्रसिद्ध झालेले त्यांचे लिखाण हा मराठीतील महत्त्वाचा दस्तावेज आहे. 'जाती व जमाती' हेही त्यांचे एक महत्त्वाचे पुस्तक आहे. या पुस्तकाचा जपानी भाषेतही अनुवाद झाला आहे. याचबरोबर भटक्या विमुक्तांचे अंतरंग, पारध, बिनचेहऱ्याची माणसं, गावगाडा : काल आणि आज, घाणेरीची फुलं, जगण्यासाठी, निळी पहाट, पुन्हा साक्षिपुरम, वेदनेच्या वाटेवरून, दलितांचा राजा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हीही त्यांची पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत.

साहित्य[संपादन]

आधारस्तंभ (नाटक) पारख (नाटक) भटक्या-विमुक्तांचे अंतरंग, जाती-जमाती, भटक्या-विमुक्तांची जातपंचायत (खंड १ ते ४) घाणेरीची फुले , वेद्नेच्या वाटेवरून 'बायको मी देवाची'(एकांकिका)

संदर्भ[संपादन]

बिनचेहऱ्याच्या माणसांना चेहरा देणारा माणूस, ले.प्रा.मिलिंद जोशी, सकाळ, ०५ मार्च २०१२