राणी चेन्नम्मा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कित्तूर चेन्नम्मा
Kittur Chenamma.jpg
राणी चेन्नम्मा
जन्म: ऑक्टोबर २३, इ.स. १७७८
कित्तूर, बेळगाव जिल्हा, कर्नाटक, भारत
मृत्यू: फेब्रुवारी २१, इ.स. १८२९
बैलहोंगल, कर्नाटक
चळवळ: १८२४ ते १८२९- स्वातंत्र्ययुद्ध
प्रमुख स्मारके: कित्तूर

कित्तूर चेन्नम्मा (कन्नड: ಕಿತ್ತೂರು ಚೆನ್ನಮ್ಮ; जन्म : काकती, २३ ऑक्टोबर १७७८; - २ फेब्रुवारी १८२९) म्हणजेच राणी चेन्नमा या कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर या संस्थानाच्या राणी होत्या. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीविरूद्ध राणीने दिलेला लढा ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे.

या राणीने ब्रिटिशांच्या दडपशाहीच्या विरोधात सन १८२४ ते १८२९ सालापर्यंत शौर्याने लढा दिला. पण संगप्पा व हुराकडली या दोन सरदारांनी इंग्रजांना शहरात शिरण्याच्या चोरवाटा दाखविल्याने इंग्रजांनी किल्यात घुसून राणी चेन्नमाला पकडले. राणी चेन्नमाला इंग्रजांनी पकडून बेलहोंगलच्या कारागृहात ठेवले. त्या कारागृहातच २ फेब्रुवारी १८२९ रोजी राणी चेन्नमाचे निधन झाले.

बालपण[संपादन]

राणी चेन्नमाचा जन्म पुणे-बेंगळूरू महामार्गावरील काकती गावातील किल्ल्यात झाला. आंध्रातील काकतीय लिंगायत संप्रदायाचे उपासक असलेल्या राजघराण्यातील घुलप्पा देसाई आणि त्यांची पत्नी पद्मावती यांच्या पोटी झाला. लहानपणापासून चेन्नमाला तिरंदाजी, अश्वारोहण, तलवारीचे युद्ध, भालायुद्ध अशा मर्दानी कलांची आवड तर होतीच, शिवाय या सर्व कलांंमध्ये तिने प्रावीण्यही मिळविले होते. चेन्नमाला कानडी, मराठी, उर्दू या भाषा अवगत होत्या.


अन्य[संपादन]

दिल्ली येथील विधानभवनात राणी चेन्नमा यांच्या पुतळ्याचे अनावरण तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते २००७ साली करण्यात आले आहे.

हेही पहा[संपादन]