राणी चेन्नम्मा एक्सप्रेस
Jump to navigation
Jump to search
१६५८९/१६५९० राणी चेन्नम्मा एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक प्रवासी रेल्वे सेवा आहे. ही गाडी दररोज मिरज ते बंगळूरच्या बंगळूर सिटी ह्या स्थानकांदरम्यान धावते. मिरज ते बंगळूरदरम्यानचे ७४९ किमी अंतर ही गाडी १४ तास व २५ मिनिटांमध्ये पूर्ण करते. ह्या गाडीला १९व्या शतकामधील कित्तूर संस्थानाची राणी असलेल्या राणी चेन्नम्मा हिचे नाव देण्यात आले आहे.सदर गाडी पूर्वी मिरज ते बंगळूर या मार्गावर धावत असे.२००२ मध्ये ती कोल्हापूरपर्यंत वाढविण्यात आली.दक्षिण पश्र्चिम रेल्वेच्या नवीन वेळापत्रकानुसार ही गाडी पुन्हा मिरजेपर्यंतच सोडण्यात येणार आहे.
वेळापत्रक[संपादन]
- १६५८९ राणी चेन्नम्मा एक्सप्रेस बंगळूरहून रात्री २१:१५ वाजता निघते व मिरजेत दुसऱ्या दिवशी दुपारी १२:०० वाजता पोचते.
- १६५९० राणी चेन्नम्मा एक्सप्रेस मिरजहून दुपारी १५:३० वाजता निघते व बंगळूरला दुसऱ्या दिवशी सकाळी ७:०० वाजता पोचते.