राणाघाट लोकसभा मतदारसंघ
Appearance
(राणाघाट (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)
राणाघाट हा भारत देशाच्या पश्चिम बंगाल राज्यामधील ४२ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ २००८ सालच्या पुनर्रचनेदरम्यान निर्माण करण्यात आला. ह्यामधील सर्व ७ विधानसभा मतदारसंघ नदिया जिल्ह्यामध्ये आहेत.
२००८ साली नबाद्वीप लोकसभा मतदारसंघ बरखास्त करण्यात आला व राणाघाट हा नवा मतदारसंघ तयार केला गेला.
खासदार
[संपादन]| लोकसभा | कालावधी | खासदाराचे नाव | पक्ष |
|---|---|---|---|
| पंधरावी लोकसभा | २००९-२०१४ | सुचरू रंजन हल्दर | तृणमूल काँग्रेस |
| सोळावी लोकसभा | २०१४-२०१९ | तपस मंडल | तृणमूल काँग्रेस |
| सतरावी लोकसभा | २०१९-२०२४ | जगन्नाथ सरकार | भारतीय जनता पक्ष |
| अठरावी लोकसभा | २०२४- | जगन्नाथ सरकार | भारतीय जनता पक्ष |