राजा ठाकूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

राजा ठाकूर (जन्म : २६ नोव्हेंबर, १९२३; मृत्यू : १९७५) हे भारतीय चित्रपट दिग्दर्शक होते. ते प्रामुख्याने मराठी चित्रपट उद्योगात कार्यरत होते. त्यांनी दिग्दर्शित केलेले मी तुळस तुझ्या अंगणी (१९५५), रंगल्या रात्री अश्या (१९६२), एकटी (१९६८), मुंबईचा जावई (१९७०), घरकुल (१९७१) आणि जावई विकत घेणे आहे (१९७२) हे चित्रपट प्रसिध्द आहेत. या चित्रपटांसांठी त्यांना अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले.

कारकीर्द[संपादन]

गोव्यातील फॊंडा येथे १९२३ साली ठाकूर यांचा जन्म झाला. त्यांनी मास्टर विनायक आणि राजा परांजपे यांचे साहाय्यक म्हणून चित्रपट कारकिर्दीला सुरुवात, केली आणि १९६०च्या सुमारास मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय कथानकांवर आधारित अनेक कौटुंबिक चित्रपट दिग्दर्शित केले.[१] यानंतर १९७० च्या दशकात दादा कोंडके यांचे विनॊदी चित्रपट येऊ लागले, त्याआधीच राजा ठाकुर यांनी 'नवचित्र' या बॅनरखाली तसेच चित्रपट काढले होते.

राजा ठाकुर यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट[संपादन]

  • अजब तुझे सरकार
  • उतावळा नारद
  • एकटी
  • गज गौरी
  • संत गोरा कुंभार
  • घरकुल
  • घरचं झालं थॊडं
  • जखमी हिंदी)
  • जावई विकत घेणे आहे
  • धनंजय
  • पाहू रे किती वाट
  • पुत्र व्हावा ऐसा
  • बाजीरावचा बेटा
  • बिरबल माय ब्रदर (इंग्रजी)
  • बोलविता धनी
  • माझे घर माझी माणसे
  • मी तुळस तुझ्या अंगणी
  • मुंबईचा जावई
  • रईसजादा हिंदी)
  • रंगल्या रात्री अश्या
  • राजमान्य राजश्री
  • रायगडचा राजबंदी
  • रेशमाच्या गाठी


पुरस्कार[संपादन]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Pathak, Madhukar (18 April 2010). "रुपेरी प्रतिभेचा राजा!". Maharashtra Times (Marathi मजकूर). 30 December 2015 रोजी पाहिले. 
  2. ^ Ministry of Information and Broadcasting (28 April 1957). "3rd National Film Awards" (PDF). 22 December 2015 रोजी पाहिले. 
  3. ^ "10th National Film Awards". International Film Festival of India. 20 April 1963. 22 December 2015 रोजी पाहिले. 
  4. ^ "16th National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. पान क्रमांक 2. 22 September 2011 रोजी पाहिले. 
  5. ^ "18th National Film Awards" (PDF). Directorate of Film Festivals. 26 September 2011 रोजी पाहिले. 
  6. a b c K. Moti Gokulsing; Wimal Dissanayake (2013). Routledge Handbook of Indian Cinemas. Routledge. pp. 81–82. आय.एस.बी.एन. 9781136772849.