रेचेल हेहो फ्लिंट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(राचेल हेहो फ्लिंट या पानावरून पुनर्निर्देशित)

रेचेल हेहो फ्लिंट (११ जून, १९३९:इंग्लंड - १८ जानेवारी, २०१७:इंग्लंड) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९६० ते १९८२ दरम्यान २२ महिला कसोटी सामने आणि २३ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती. १९७३ महिला क्रिकेट विश्वचषकात राचेलने इंग्लंड महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व करीत इंग्लंडला पहिल्या महिला विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद मिळवून दिले.

महिला कसोटीत षटकार मारणारी हेहो फ्लिंट ही प्रथम खेळाडू होती. इंग्लंड महिला क्रिकेट संघाच्या जडणघडणीत हेहो फ्लिंटचे खूप योगदान आहे.