Jump to content

जितेंद्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रवी कपूर या पानावरून पुनर्निर्देशित)
जन्म रवी कपूर
७ एप्रिल, १९४२ (1942-04-07) (वय: ८२)
अमृतसर, पंजाब
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनेता, निर्माता
कारकीर्दीचा काळ १९५९ - आजतागायत
भाषा पंजाबी
पत्नी
अपत्ये एकता कपूर, तुषार कपूर

रवी कपूर उर्फ जितेंद्र ( जन्म :७ एप्रिल, १९४२), हे एक ज्येष्ठ हिंदी चित्रपट अभिनेते असून, १९५९ पासून हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती. ते बालाजी टेलिफिल्म्स आणि बालाजी मोशन पिक्चर्सचे अध्यक्ष म्हणूनही काम करतात. रोमँटिक हिरो म्हणून जितेंद्र यांची ओळख आहे.

जितेंद्रचा जन्म पंजाबी खत्री कुटुंबात अमृतसर, पंजाब येथे रवी कपूर म्हणून अमरनाथ आणि कृष्णा कपूर या जोडप्याच्या पोटी झाला. त्यांचा इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय होता. हे दागिने चित्रपट उद्योगाला पुरवठा केले जात असत. त्यांनी आपला मित्र राजेश खन्ना यांच्यासोबत गिरगाव, मुंबई[१] येथील सेंट सेबॅस्टियन गोवन हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण आणि मुंबईतील सिद्धार्थ कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेतले. व्ही. शांताराम यांना दागिन्यांचा पुरवठा करताना, त्यांनी १९५९ च्या नवरंग चित्रपटात संध्या सोबत दुहेरी भूमिकेत प्रथम काम केले होते. त्यानंतर त्यांनी परत कधी मागे वळून पाहिले नाही.[२]

२०१६ मध्ये मुलगी एकता कपूर आणि मुलगा तुषार कपूर सोबत

पुरस्कार आणि सन्मान

[संपादन]
  • १९९८ - 18व्या उजाला सिनेमा एक्सप्रेस अवॉर्ड्समध्ये गेस्ट ऑफ ऑनर पुरस्कार [३]
  • २००२ - न्यू यॉर्कमधील झी गोल्ड बॉलीवूड मूव्ही अवॉर्ड्समध्ये जीवनगौरव पुरस्कार. [४]
  • २००३ - फिल्मफेर जीवनगौरव पुरस्कार
  • २००४ - अटलांटिक सिटी (युनायटेड स्टेट्स) येथे "लिजेंड ऑफ इंडियन सिनेमा" पुरस्कार. [५]
  • २००५ - स्क्रीन जीवनगौरव पुरस्कार
  • २००८ - सानसुई टेलिव्हिजन जीवनगौरव पुरस्कार[६]
  • २०१२ - जीवनगौरवसाठी झी सिने पुरस्कार
  • २०१२ - लायन्स गोल्ड अवॉर्ड्स: मोस्ट एव्हरग्रीन रोमँटिक हिरो [७]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Jeetendra Biography, Jeetendra Bio data, Profile, Videos, Photos". in.com. 15 April 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-04-07 रोजी पाहिले.
  2. ^ "Jeetendra". IMDb. 25 January 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2016-04-07 रोजी पाहिले.
  3. ^ "Cinema Express awards presented". Indianexpress.com. 24 August 1998. 21 February 2019 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 21 February 2019 रोजी पाहिले.
  4. ^ "Bollywood News: Bollywood Movies Reviews, Hindi Movies in India, Music & Gossip". Rediff.com. 21 February 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 21 February 2019 रोजी पाहिले.
  5. ^ [१] Archived 2006-05-08 at the Wayback Machine.
  6. ^ "Winners of Sansui Awards 2008 – RS Bollywood Online". Radiosargam.com. 30 March 2008. 19 July 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 May 2010 रोजी पाहिले.
  7. ^ "19th Lions Gold Awards 2013 Winners". Pinkvilla. 17 January 2013. 21 January 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 18 January 2013 रोजी पाहिले.