Jump to content

रवी कुमार दहिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रविकुमार दहिया या पानावरून पुनर्निर्देशित)

रवी कुमार दहिया (१२ डिसेंबर १९९७) हा भारतीय फ्री स्टाईल कुस्तीगीर आहे ज्याने २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्ये ५७ किलो गटात रौप्य पदक जिंकले.[][][] तो रवी कुमार म्हणूनही ओळखला जातो. तो हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यातील नहरी गावचा आहे. दहिया हा 2019च्या जागतिक कुस्ती चॅम्पियनशिपमधील कांस्यपदक विजेता आहे, तसेच त्याने दोन वेळा आशियाई चॅम्पियन स्पर्धा देखील जिंकली.[]

भारत सरकारने 2021 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा भारताचा सर्वोच्च क्रीडा सन्मान देऊन रवीचा गौरव केला.[]

वैयक्तिक पार्श्वभूमी

[संपादन]

कारकीर्द

[संपादन]

तोक्यो ऑलिम्पिकमध्ये कझाकिस्तानचा कुस्तीगीर नुरीस्लॅम सनयेव याचा पराभव करून रवी कुमारने ५७ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.[] अंतिम फेरीमध्ये रशियाच्या झागुर युगूएव्हकडून पराभूत झाल्यावर रवी कुमारला रौप्यपदक मिळाले.[] तोक्यो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळवणारा मीराबाई चानूनंतर रौप्यपदक मिळवणारा रवी कुमार हा दुसरा भारतीय ठरला.

तसेच ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कुस्ती या खेळात पदक मिळवणारा खाशाबा जाधव, सुशील कुमार, योगेश्वर दत्त आणि साक्षी मलिकनंतर पाचवा भारतीय कुस्तीगीर ठरला.

पुरस्कार

[संपादन]
  • २०२१ मध्ये रवी कुमारला भारत सरकारचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देण्यात आला.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ a b "भारताला रौप्यपदक जिंकवून देणारा रवी दहिया आहे तरी कोण, जाणून घ्या सर्व माहिती..." Maharashtra Times. 2022-01-27 रोजी पाहिले.
  2. ^ "Ravi Kumar Dahiya win Silver Medal: तोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताला आणखी एक रौप्य; कुस्तीत रवीकुमाने इतिहास घडवला". Maharashtra Times. 2022-01-27 रोजी पाहिले.
  3. ^ "व्वा पठ्ठ्या! रविनं प्रतिस्पर्ध्याला दाखवलं आस्मान; आणखी एक पदक निश्चित". eSakal - Marathi Newspaper. 2022-01-27 रोजी पाहिले.
  4. ^ "National Sports Awards 2021: Neeraj Chopra, Lovlina Borgohain, Mithali Raj Among 9 Others to Get Khel Ratna". News18 (इंग्रजी भाषेत). 2021-11-02. 2022-01-27 रोजी पाहिले.
  5. ^ "Tokyo Olympics 2020 : फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात भारताचं मेडल पक्कं! रवीकुमार दहीयाचा अंतिम फेरीत प्रवेश!". Loksatta. 2021-08-04. 2021-08-04 रोजी पाहिले.
  6. ^ "Ravi Kumar Dahiya win Silver Medal: तोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताला आणखी एक रौप्य; कुस्तीत रवीकुमाने इतिहास घडवला". Maharashtra Times. 2021-08-06 रोजी पाहिले.
  7. ^ "National Sports Awards 2021 announced". pib.gov.in. 2021-11-20 रोजी पाहिले.