रवी किशन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रविकिशन या पानावरून पुनर्निर्देशित)
रवी किशन
रवी किशन
विद्यमान
पदग्रहण
२३ मे, इ.स. २०१९
राष्ट्रपती राम नाथ कोविंद
मतदारसंघ गोरखपूर (लोकसभा मतदारसंघ)

रवी किशन (१७ जुलै, १९७१:सांताक्रुझ, मुंबई, महाराष्ट्र - ) हा भोजपुरी आणि हिंदी चित्रपटांत काम करणारा अभिनेता आहे. वयाच्या १०व्या वर्षी घरच्या दूध व्यवसायात मतभेद झाल्याने त्याचे कुटुंब मुंबई सोडून उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे आले.

अभिनयाची कारकीर्द[संपादन]

रवीकिशन लहानपणी रामलीेलेमध्ये छोटीछोटी कामे करीत असे. मोठा झाल्यावर त्याने भोजपुरी व हिंदी चित्रपटांत कामे करण्यास सुरुवात केली. रिॲलिटी शो बिग बाॅसच्या ६व्या सीझनमध्ये त्याने भाग घेतला होता.

रवी किशनचा आणि अजितसिंहचा अभिनय असलेला भोजपुरी चित्रपट-जला देब दुनिया तुहरा प्यार में-हा एका अमेरिकन कंपनीने बनवला होता. कान्स चित्रपट महोत्सवात तो प्रदर्शित झाला होता.

रवी किशन याने काही भोजपुरी दूरचित्रवाणी मालिका प्रायोजित केल्या आहेत. त्यांपैकी 'बाथरूम सिंगर एक से एक बढकर' ही विशेष गाजली. सलमान खानचा अभिनय असलेल्या व २००३ साली आलेल्या 'तेरे नाम' या हिंदी बोलपटामधील भूमिकेमुळे रवी किशन याला बरीच प्रसिद्धी मिळाली.

राजकीय कारकीर्द[संपादन]

सन २०१४मध्ये रवी किशनने काँग्रेसच्या तिकिटावर जौनपूर मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली, पण तीत त्याला भारतीय जनता पक्षाच्या के.पी. सिंह यांनी मतांच्या फार मोठ्या फरकाने हरवले. त्यानंतर रवी किशनने भारतीय जनता पक्षाच्या (भाजपच्या) राष्ट्रीय अध्यक्षांच्या, अमित शहांच्या, उपस्थितीत १९ फेब्रुवारी २०१७ रोजी 'भाजप'त प्रवेश केला. लगेचच्या २०१९ सालच्या सार्वत्रिक निवडणुकीत गोरखपूर मतदार संघातून निवडून येऊन रवी किशन १७व्या लोकसभेचे खासदार झाले.

हिंदी चित्रपट[संपादन]

  • अमृतसागर
  • बाटला हाऊस
  • मध्यमवर्ग (मराठी)
  • मुक्काबाज

पुरस्कार[संपादन]