Jump to content

यशवंत राजाराम गुप्ते

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
य.रा.गुप्ते
जन्म नाव यशवंत राजाराम गुप्ते
जन्म १६ सप्टेंबर १८८१
मृत्यू ११ मार्च १९५९
शिक्षण बी.ए., एम.आर.ए.एस.
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र इतिहास संशोधन
भाषा मराठी
साहित्य प्रकार इतिहास , स्थलवर्णन
वडील राजाराम गुप्ते

यशवंत राजाराम गुप्ते तथा य.रा.गुप्ते हे इतिहास संशोधक होते. ब्रिटिश सरकारच्या पुराणवस्तू खात्यात अधिकारी होते.[] मराठा इतिहासावरील अनेक ऐतिहासिक कागदपत्रे त्यांनी प्रसिद्ध केली. तसेच त्यांचे इतिहास विषयक लेख विविध नियतकालिकांमधून प्रसिद्ध होत असत.

नोकरी

[संपादन]

भारतातील ब्रिटिश सरकारच्या पुराणवस्तू संशोधन खात्यात नोकरीला असताना पंजाब व संयुक्त प्रातांतील पुरातत्त्वीय स्थानांच्या सर्वेक्षणाच्या कामावर सहाय्यक सर्वेक्षक म्हणून त्यांनी काम केले. पुराणवस्तू संशोधन खात्याच्या एपिग्राफी (पुराभिलेखविद्या) विभागात सहाय्यक अधीक्षक या पदावरही ते कार्यरत होते.[]

ग्रंथ संपदा

[संपादन]
  1. आमची परळीची (सज्जनगडची) यात्रा , १९२८
  2. ग्वाल्हेर येथील व आसपासच्या ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थलांचे संक्षिप्त वर्णन , १९२८
  3. कऱ्हाड , १९२७, १९२९[]
  4. घारापुरीची लेणी , १९४२
  5. सखाराम हरी गुप्ते, १९४६[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ गुप्ते, य.रा. (१९२९). कऱ्हाड. खेड: य.रा.गुप्ते. pp. शीर्षकपृष्ठ.
  2. ^ गुप्ते, य.रा. (१९२९). कऱ्हाड. खेड: य.रा.गुप्ते. pp. शीर्षकाशपृष्ठ.
  3. ^ गुप्ते, यशवंत राजाराम (१९२९). कऱ्हाड (PDF) (२ आवृत्ती ed.). खेड: यशवंत राजाराम गुप्ते.
  4. ^ गुप्ते, यशवंत राजाराम (१९४६). सखाराम हरी गुप्ते (PDF) (प्रथम आवृत्ती ed.). पुणे: लक्ष्मण नारायण चापेकर.