यशवंत राजाराम गुप्ते
Appearance
य.रा.गुप्ते | |
---|---|
जन्म नाव | यशवंत राजाराम गुप्ते |
जन्म | १६ सप्टेंबर १८८१ |
मृत्यू | ११ मार्च १९५९ |
शिक्षण | बी.ए., एम.आर.ए.एस. |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | इतिहास संशोधन |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | इतिहास , स्थलवर्णन |
वडील | राजाराम गुप्ते |
यशवंत राजाराम गुप्ते तथा य.रा.गुप्ते हे इतिहास संशोधक होते. ब्रिटिश सरकारच्या पुराणवस्तू खात्यात अधिकारी होते.[१] मराठा इतिहासावरील अनेक ऐतिहासिक कागदपत्रे त्यांनी प्रसिद्ध केली. तसेच त्यांचे इतिहास विषयक लेख विविध नियतकालिकांमधून प्रसिद्ध होत असत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
नोकरी
[संपादन]भारतातील ब्रिटिश सरकारच्या पुराणवस्तू संशोधन खात्यात नोकरीला असताना पंजाब व संयुक्त प्रातांतील पुरातत्त्वीय स्थानांच्या सर्वेक्षणाच्या कामावर सहाय्यक सर्वेक्षक म्हणून त्यांनी काम केले. पुराणवस्तू संशोधन खात्याच्या एपिग्राफी (पुराभिलेखविद्या) विभागात सहाय्यक अधीक्षक या पदावरही ते कार्यरत होते.[२]
ग्रंथ संपदा
[संपादन]- आमची परळीची (सज्जनगडची) यात्रा , १९२८
- ग्वाल्हेर येथील व आसपासच्या ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थलांचे संक्षिप्त वर्णन , १९२८
- कऱ्हाड , १९२७, १९२९[३]
- घारापुरीची लेणी , १९४२
- सखाराम हरी गुप्ते, १९४६[४]
संदर्भ
[संपादन]- ^ गुप्ते, य.रा. (१९२९). कऱ्हाड. खेड: य.रा.गुप्ते. pp. शीर्षकपृष्ठ.
- ^ गुप्ते, य.रा. (१९२९). कऱ्हाड. खेड: य.रा.गुप्ते. pp. शीर्षकाशपृष्ठ.
- ^ गुप्ते, यशवंत राजाराम (१९२९). कऱ्हाड (PDF) (२ आवृत्ती ed.). खेड: यशवंत राजाराम गुप्ते.
- ^ गुप्ते, यशवंत राजाराम (१९४६). सखाराम हरी गुप्ते (PDF) (प्रथम आवृत्ती ed.). पुणे: लक्ष्मण नारायण चापेकर.