यज्ञदत्त शर्मा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

यज्ञदत्त शर्मा (ऑक्टोबर २१, इ.स. १९२२ - जुलै ४, इ.स. १९९६) हे भारतीय जनसंघ आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. ते इ.स. १९६७ च्या लोकसभा निवडणुकीत पंजाब राज्यातील अमृतसर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. तसेच ते इ.स. १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत पंजाब राज्यातील गुरूदासपूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते इ.स. १९७७ ते इ.स. १९८० या काळात जनता पक्षाचे नेते होते. तसेच इ.स. १९९० ते इ.स. १९९३ या काळात ते ओडिशा राज्याचे राज्यपाल होते.