यंग झिंगारो ट्रेकर्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

यंग झिंगारो ट्रेकर्स हा सह्याद्री पर्वतामध्ये डोंगरभ्रमंती करणारा मुंबईतील एक क्लब आहे. याची स्थापना हृषिकेश यादव नावाच्या तरुणाने १९८२ साली केली. त्यापूर्वी पुण्यात यूथ हॉस्टेलमध्ये राहत असताना त्यांनी १९७४पासून सह्याद्रीमध्ये भटकंती केली होती.

यंग झिंगारो ट्रेकर्सने अनेक उपक्रम राबवले. त्यात गड-किल्ल्यांची सफर घडवून आणणे गिर्यारोहण शिकवणे, इ.चा समावेश आहे. हा क्लब दरवर्षी १५ ऑगस्टला अंध-अपंगांना ट्रेकवर घेऊन जातो. तसेच त्यांना हिमालयावर गिर्यारोहण करण्यासही घेउन गेला.

यंग झिंगारोच्या ५० सदस्यांनी तीन वर्षांत सह्याद्रीच्या २२५ किल्ल्यांची माहिती जमवून १०० सुळके, अनेक लेणी आणि पशुपक्षी याची छायाचित्रे जमवली, आणि या माहितीवर आधारलेली सांगाती सह्याद्रीचा आणि सह्याद्री कम्पॅनियन अशी दोन पुस्तके काढली.

हृषिकेश यादव हे अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे गेली २० वर्षे कार्याध्यक्ष आहेत. या महासंघाद्वारे त्यांनी माउंट एव्हरेस्ट-चढाईची पहिली यशस्वी नागरी मोहीम केली.