Jump to content

मोहाळ्या मोरगा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Oriental Honey Buzzard Male
Crested honey buzzard,Morinda ,Punjab, India

या पक्षाला इंग्रजीमध्ये creasted Honey Buzzard असे म्हणतात व याला मराठीमध्ये मधमाशी मुरुग असे म्हणतात .

ओळखण

[संपादन]

ह्या पक्षाचे आकारमान मध्यम आकाराच्या घारीएवढे असते. पक्ष्याच्या वरील भागाचा वर्ण राखट तपकिरी असून, त्यावर जवळ -जवळ असलेले पांढरे पट्टे असतात. माथ्यावर किंचित दिसणारी शेंडी असते. पंखाखालील रंग चंदेरी करडा असतो. त्यावर गर्द वर्णाचे पट्टे असतात. शेपूट गोलाकार असते .

वितरण

[संपादन]

हे पक्षी भारतात सर्व ठिकाणी स्थायिक व स्थानिक स्थलांतर करणारे आहेत. तसेच ते बहुधा हिवाळ्यात दिसतात.

निवासस्थाने

[संपादन]

पानगळीची जंगले, अरण्ये आणि वाळवंटी भूप्रदेश .

संदर्भ

[संपादन]

पक्षिकोश

लेखकाचे नाव -मारुती चित्तमपल्ली